आदिपुरुष ची अभिनेत्री क्रिती सेननने माता सीतेचे केले दर्शन

आदिपुरुष

रामायणावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री रामचंद्रांच्या भूमिकेत प्रभास आणि माता सिताच्या भूमिकेत क्रिती सेनन दिसणार आहेत. चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार असून अजून १५ दिवस बाकी आहेत. दरम्यान, चित्रपटप्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री क्रिती सेनन पंचवटी नाशिक येथील सीता गुहा आणि काळाराम मंदिरात माता सीतेच्या दर्शनासाठी पोहोचली.

आदिपुरुष ची मुख्य नायिका दर्शनासाठी काळाराम मंदिरात

आदिपुरुष

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकार खूपच मेहनत घेत असतात. क्रिती सेनन सुद्धा ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसतेय. सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.ती प्रभू श्री रामचंद्र आणि सीता मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी पंचवटी नाशिक येथे पोहोचली.तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो सध्या सोशल मिडीया वरती खूप व्हायरल खूप व्हायरल होत आहेत.

ती या फोटोमध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि सीता मातेचे दर्शन घेताना दिसत आहे.दर्शना नंतर तिने प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामातेची धूपारती सुद्धा केली.

नुकतेच या चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे भजन यु ट्यूब वर रिलीज करण्यात आले आहे आणि लोकांनी सुद्धा या भजनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे गाणे सचेत आणि परंपरा या जोडीने गायले असून ते दोघेही क्रिती सेननसोबत पंचवटी येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी मंदिरात हे भजन गाऊन प्रभू श्री रामचंद्र आणि सीता मातेची धुपारती केली.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याच्या बजेट आणि व्हीएफएक्सबद्दल खूप चर्चेत आहे. जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा लोकांना त्याचा व्हीएफएक्स अजिबात आवडला नाही. ज्यानंतर या चित्रपटाविषयी बराच गदारोळ झाला होता. ज्यानंतर निर्मात्यांनी वेळ काढून चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम केले. आता ‘आदिपुरुष’ प्रेक्षकांच्या अपेक्षेवर कितपत खरा उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आदिपुरुष चे ‘राम सिया राम’ रिलीज किती कोटीला विकले राईटस

Kriti Sanon Seeks Blessings At Sita Gufa, 

Leave a comment

कोण आहे Wamika Gabbi? शिक्षण, बेबी जॉन अभिनेत्रीची पार्श्वभूमी “Mohammed Rafi : Melodies That Transcend Time and Hearts!” हिंदू पुराणातील ७ चिरंजीवी: जे आजही जिवंत आहेत ‘ओला रोडस्टर’ इलेक्ट्रिक किंमत आणि रेंज ऐकून थक्क व्हाल… Royal Enfield Continental GT 650 किंमत पाहिली का ?
कोण आहे Wamika Gabbi? शिक्षण, बेबी जॉन अभिनेत्रीची पार्श्वभूमी “Mohammed Rafi : Melodies That Transcend Time and Hearts!” हिंदू पुराणातील ७ चिरंजीवी: जे आजही जिवंत आहेत ‘ओला रोडस्टर’ इलेक्ट्रिक किंमत आणि रेंज ऐकून थक्क व्हाल… Royal Enfield Continental GT 650 किंमत पाहिली का ?