Advance बुकींग
आदिपुरुष पौराणिक हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित तेलुगू सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची भूमिका केली आहे, क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे, सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत आहे, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे तर देवदत्त नागे महाबली हनुमानाची भूमिका साकारतोय.
500 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. रविवारी advance बुकींग उघडल्यानंतर या चित्रपटाने १२ कोटींचा व्यवसाय केला. PVR ने हिंदी मार्केटमध्येच एक लाखाहून अधिक तिकिटे विकली आहेत तर देशभरातील तिकीट काउंटरवर मोठ्या प्रमाणावर तिकीट विक्रीची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
चित्रपट विश्लेषण
चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी सर्व भाषांसह चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन ५० कोटी रुपये असल्याचे सांगितले. भारतीयांमध्ये रामायणबद्दल असलेल्या क्रेझबद्दल बोलताना, चित्रपट व्यापार तज्ञ तरण आदर्श म्हणाले, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभास, क्रिती सॅनन किंवा सैफ अली खान नाही. माझ्यासाठी हे रामायण आहे.
भारतीयांच्या मनात असलेली प्रभू श्री राम यांच्याबद्दलची भावना याच्या समोर बाकी सर्व दुय्यम आहे,” पहिल्या दिवसाचे कलेक्शन आणखी जास्त असू शकते आणि शाहरुख खानच्या पठाण च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे तकू शकते.
देवदत्त नागे भावनिक
एका मुलाखतीत, आदिपुरुष मध्ये हनुमानाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे म्हणाले, ‘आमच्या सर्वांसाठी Adipurush हा सामान्य चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव होता. प्रभू श्रीराम आणि बजरंगबली यांच्यातील नातेसंबंध आत्मसात करण्यासाठी मला प्रभासमध्ये रामाचे रूप जाणवत होते.
प्रभाससाठी ती भावना आपोआप यायची. बाकी कलाकारांसोबत मी सेटवर बसायचो. पण प्रभास कुठूनही आला की आपोआप उठून उभा रहायचो. हे सर्व आपोआप घडायचं. त्याने मला वारंवार बसायला सांगितले, पण मी तसे करू शकलो नाही.
रामायणातील अति महत्वाचा प्रसंग म्हणजे प्रभू श्री राम आणि हनुमान यांची पहिली भेट. ट्रेलरमध्ये प्रभू श्री राम आणि हनुमान भेटतात असे दृश्य आहे. तिथे हनुमानाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा की तो शॉट देताना माझे डोळे खरेच ओले झाले होते. कारण त्याच भावनेने मी प्रभासलाही भेटलो होतो. तो शॉट मिळाल्यानंतर आमचे दिग्दर्शक ओम राऊत यांनाही खूप आनंद झाला.
तिकीट दरवाढ
दोन्ही तेलुगू राज्य सरकारांनी तिकीट दर ५० रुपयांनी वाढवण्याची परवानगी दिली आणि अतिरिक्त शो (प्रतिदिन ६ शो) साठी परवानगी दिल्याने Adipurush ला चालनाही मिळाली आहे . यासह, चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमी वेळात खूप मोठी कमाई करेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्या डबिंग आवृत्त्यांमध्ये तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.
Read more: आदिपुरुष : देवदत्त नागेची भावनिक प्रतिक्रियाOMG 2 ची रिलीज डेट जाहीर अक्षय कुमार दिसणार भगवान शिवच्या भूमिकेत
Disha Patani Movies : दिशा पटानीचे चित्रपट
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.