मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाइन वर मुंबईकरांच्या तक्रारीनंतर कचरा आणि डेब्रिज तातडीने उचलण्यात यावा. यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावी वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ आणि कचरामुक्त व्हावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी apocalypse policy आमलात आणणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यावरील कचरा आणि डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार मुंबईकरांना ८१६९६८१६९७ या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाइन वर तक्रार नोंदवता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रारी केल्यानंतर २४ तासांत कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया
महापालिकेने या यंत्रणेसाठी 10 कनिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतीच भारतातील जपानच्या राजदूताने माझी भेट घेतली. बदललेल्या मुंबईचेही कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
OMG 2 ची रिलीज डेट जाहीर अक्षय कुमार दिसणार भगवान शिवच्या भूमिकेत
Love Marriage का टिकत नाहीत ? काय भन्नाट सांगितलंय…
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.