प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती पुण्यातील वासुदेव कामत यांच्या चित्रातील नमुन्याच्या आधारे बनणार

प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती

पवित्रभूमी अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. २०२४ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण होईल असा दावा आहे . मंदिर उभारणीबरोबरच आता प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती बनवण्याचे कामही सुरू झाले आहे. श्री राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार हि मूर्ती बालस्वरुपातील असून ती बनवण्यासाठी कारागिरांची पथके येथे पोहोचली आहेत.


देशातील नामवंत शिल्पकार

यामध्ये कर्नाटकचे शिल्पकार गणेश एल. भट्ट, राजस्थानचे शिल्पकार सत्यनारायण पांडे, म्हैसूरचे पद्मविभूषण सुदर्शन साहू आणि अरुण योगीराज यांचा समावेश आहे. यातील काही पथके अयोध्येत दाखल झाली असून त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती बनविण्याचे काम सुरु केले आहे.

प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती कशाच्या आधारे बनवली जाणार आहे ?

श्रीराम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाच्या बालरूपाची (५ वर्षे) मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी श्रीरामाच्या बालरूपाची विविध ग्रंथातून माहिती गोळा करून त्याच्या आधारे महाराष्ट्रातील पुणे येथील चित्रकार वासुदेव कामंत यांनी एक नमुना चित्र तयार केले आहे त्याच्या आधारे मूर्ती घडवली जाणार आहे. मूर्तीची लांबी ५२ इंच असेल. फाऊंडेशनसह मूर्तीची एकूण उंची सुमारे ८ फूट असेल.

श्रीरामाच्या बालरूपाचे वर्णन

प्रभू श्रीरामाच्या बालरूपाचे वर्णन अनेक धर्मग्रंथांमध्ये आढळत असले तरी सर्वात अचूक वर्णन वाल्मिकी रामायणातील बालकांडाच्या पहिल्या अध्यायात आहे. त्यांच्या मते इक्ष्वाकु वंशात जन्मलेल्या श्रीरामाचे खांदे जाड आणि हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत .छाती रुंद आहे. डोके सुंदर आहे , डोळे मोठे आहेत.कपाळ भव्य आहे . शरीर मध्यम आणि सुडौल आहे.


वैशिष्ट्य

२०२४ च्या मकरसंक्रातीला गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून ३५ फुट अंतरावरून या मूर्तीचे दर्शन घेता येईल तसेच हि मूर्ती अशा ठिकाणी बसविण्यात येणार आहे कि रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श करतील त्यासाठी खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक विज्ञानातील तज्ञ नियोजन करणार आहेत.

Shree Ram Statue in Ayodhya

Mandakini : मंदाकिनी एक गूढ बॉलीवूड अभिनेत्री


Leave a comment