रत्नागिरी जेट संघाकडून खेळणार…
महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग घेतला. या सहा संघाने मिळून तब्बल 128 खेळाडूंवर बोली लावली. ही स्पर्धा पुणे येथील एमसीएच्या गहुजे येथील अंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 14 जून पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, अजीम काझी, उमेश पटवाल यांचेसह अनेक युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचवेळी यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जगभरात आपले नाव केलेला अष्टपैलू विजय पावले याला देखील संधी मिळाली. आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजयला संधी मिळाल्याने क्रिकेटच्या विश्वातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार
विजय पावले हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा खेळाडू असून आतापर्यंत त्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रमाची नोंद आहे. दुबई येथील शारजहा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तो अनेक वेळा भारतीय संघाचा भाग राहिला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस विश्वात त्याने आपली वेगळी छाप पाडलीये.
टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावले असले तरी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात लेदर बॉल क्रिकेटने केली होती. सांगली जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व ही त्याने केले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी त्याला मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून जाण्याची देखील सुवर्णसंधी मिळालेली. त्याला IPL सराव सत्रामध्ये सहारा स्टेडियमवर विश्व विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला गोलंदाजी तर न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रॅंकलिन सोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक उमेश पटवाल यांनी त्याची गोलंदाजी व फलंदाजी पाहून पुणे क्लबकडून खेळण्याचे निमंत्रण दिले होते.
एमपीएल मध्ये अनुभवी खेळाडू सोबत खेळणार
टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार असलेला विजय आता एमपीएलमध्ये जेट सिंथेसिस यांच्या मालकीच्या रत्नागिरी जेट संघाचा भाग असेल. त्याच्यावर बोली लावत त्यांनी विश्वास दाखवला आहे. या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेले अझीम काझी, निखिल नाईक, दिव्यांग हिंगणेकर व निकीत धुमाळ हे अनुभवी खेळाडू देखील सामील आहेत.
Read more: सांगलीच्या विजय पावलेची एमपीएल स्पर्धेसाठी निवड….OMG 2 ची रिलीज डेट जाहीर अक्षय कुमार दिसणार भगवान शिवच्या भूमिकेत
Love Marriage का टिकत नाहीत ? काय भन्नाट सांगितलंय… » 24yesnews.com
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.