OMG या जगात लोक काय करतील याचा काही नेम नाही.मग ते प्रसिद्धीसाठी असो किंवा छंद जोपासण्यासाठी असो. भारतामध्ये सुद्धा अशी जुगाडू लोक खूप आहेत.या लेखात आपण अशाच प्रकारच्या एका Boeing 727 चे घरात रुपांतर करणाऱ्या जुगाडूबद्दल जाणून घेणार आहोत.ज्याचे नाव आहे ब्रूस कॅम्पबेल.
ब्रूस कॅम्पबेल हा 64 वर्षीय कॅनेडियन असून तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याच्याबद्दल खरोखरच एक महत्वाची गोष्ट काय आहे, तर त्याची आउट-ऑफ-द-बॉक्स विचारसरणी तो विचार हटके करतो. आणि असे हटके विचारच माणसाला काही ना काही वेगळं करायला भाग पाडतात.
तो ज्या “घरात” राहतो तो निश्चितच त्याचा आजीवन प्रकल्प मानला जाऊ शकतो, कारण त्याने विसाव्या वर्षी ओरेगॉनच्या हिल्सबोरोच्या जंगलात 10 एकर जमीन विकत घेऊन या ऐतिहासिक कामगिरी करण्याची आधीपासूनच तयारी सुरु केली होती.
ती जमीन, जी आज अवाढव्य Boeing 727 चे म्हणजे एका भल्या मोठ्या विमानाचे विश्रांतीचे ठिकाण बनले आहे. त्याने एक जुने विमान आणि त्या जमिनीच्या मोठ्या तुकड्याचा खरोखरच आश्चर्यकारक रीत्या आपल्या घरात कसा बदल केला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
कल्पनाशक्ती आणि योजना
ब्रूस कॅम्पबेल नेहमीच त्याच्या छंदांसाठी ओळखला जातो. लहानपणापासूनच, त्याला जुन्या वस्तूंशी छेडछाड करणे आणि त्यांना काहीतरी नवीन आणि रोमांचक बनविणे आवडते. त्याची योजना मालवाहतूकदारांकडून एक अनोखे घर बांधण्याची होती, परंतु एकदा त्याला जोआन युसेरी आणि तिच्या “निवासी विमान” बद्दल कळले तेव्हा त्याने आपला विचार बदलला.
तिचे मूळ घर जळून खाक झाल्यानंतर जोआन युसेरी (मिसिसिपी येथील हेअरस्टायलिस्ट) ने एका चालू विमानाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ब्रूसला तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा मिळाली. ब्रूस ने जरी जुन्या मालवाहू वाहनांपासून घर बनवले असते तरी ते सुद्धा खूपच आकर्षक बनले असते असे त्याच्या या आत्ता बनवलेल्या घरावरून नक्की अंदाज येतो.
ब्रूस कॅम्पबेलने Boeing 727 कसे खरेदी केले ?
ही खरेदी 1999 मध्ये करण्यात आली होती. कॅम्पबेलने ऑलिंपिक एअरवेजकडून विनासेवेतून निवृत्त केलेले Boeing 727 विमान खरेदी केले होते. विमान निवृत्त झाले होत तरीही त्याची किंमत अजूनही $100.000 होती. परंतु त्याहूनही महाग ठरले ते जंगलात नेणे.अथेन्स, ग्रीस (जेथे विमान सुरुवातीला होते) ते ब्रूस कॅम्पबेलच्या जमिनीच्या तुकड्यापर्यंतच्या वाहतुकीसाठी तब्बल $120.000 खर्च आला.हे सांगण्याची गरज नाही की त्याने Boeing 727 वरती खर्च केलेले $220.000 शेवटी ते कामास आले.
इंटिरियर
त्याने आपल्याला हव्या असलेल्या सर्व सुखसोयीसाठी विमानाच्या आतील भागात बदल केला आहे. त्यामध्ये ब्रूस ने Boeing 727 मधील बऱ्याच गोष्टी जश्याच्या तशा ठेऊन वापरात आणल्या आहेत जसे कि अजूनही मूळ एअरलाइन सीट्स आणि अगदी टॉयलेट्स सुद्धा अजूनही शाबूत आहेत. त्याची हि सर्वात मोठी खरेदी असूनही, ब्रूस कॅम्पबेल अतिशय साध्या पद्धतीने जगतो तो निश्चितपणे लक्झरी जीवन जगत नाही. सिंक आणि वॉशिंग मशिन यांसारख्या उपकरणां व्यतिरिक्त, ब्रूसने हाताने बनवलेली बरीच उपकरणे तो त्याचे दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी वापरतो.
तुम्ही असे काही करण्याच्या भानगडीत पडू नका हे फक्त प्रदेशातच घडू शकते.
Read more: हा माणूस विमानात Boeing 727 मध्ये राहतो.
हि बाई रोज रात्री अजगर सोबत झोपायची पण झाले काही असे…
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.