1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, तारा सिंग (सनी देओल) आपल्या मुलाला (उत्कर्ष शर्मा) भारतात परत आणण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानला परतला. Gadar 2 हा चित्रपट 2001 च्या पीरियड ड्रामा गदर: एक प्रेम कथाचा थेट सीक्वल आहे.
Gadar 2 अगोदर गदर: एक प्रेम कथा पुन्हा री रीलीज होणार
मुंबई, लखनौ, इंदूर आणि जयपूर या चार शहरांमध्ये गदर: एक प्रेम कथा सनी देओल आणि अनिल शर्माच्या रि-रिलीज भव्य प्रीमियरसाठी तयारी सुरु आहे. हा चित्रपट 9 जून रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे, तर गदर 2 हा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
गदर: एक प्रेम कथा हा 2001 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुद्धा केली होती. “गदर री-रिलीज हा 2001 मध्ये पहिल्या चित्रपटाच्या रिलीजइतकाच मोठा असेल. भारतातील चार प्रमुख शहरांसोबत मुबी मध्ये सुद्धा हा चित्रपट रिलीज होणार आहे.
गदर: एक प्रेम कथा रिलीज होऊन आज वीस बावीस वर्षे उलटून गेली आत्ता “अशी एक पिढी आहे ज्याने गदरबद्दल फक्त ऐकले आहे,पण त्यांना मोठ्या पडद्यावर त्याचा आनंद घेता आलेला नाही. म्हणून हि री-रिलीझची योजना आखण्प्रेयात आली आहे. या दिमाखदार सोहळ्यात ” सनी देओल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा व्यतिरिक्त अमिषा पटेल देखील उपस्थित राहणार आहे.
अलीकडेच दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर 2 चे पॅचवर्क पूर्ण झाल्याची घोषणा केली. ट्विटरवर शेअर करताना, चित्रपट निर्मात्याने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो त्याच्या क्रू सह ‘मैं निकला गाडी लेके’ वर नाचताना दिसत आहे. त्याने लिहिले, “पॅचवर्क शूटचा शेवटचा दिवस आणि चला एकत्र साजरा करूया गदर 2 जो 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.आता प्रतीक्षा आहे 11 ऑगस्टची बघुया गदर २ प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतोय आणि बॉक्स ऑफिस वर काय कमाल दाखवतोय.
आदिपुरुष चे ‘राम सिया राम’ रिलीज किती कोटीला विकले राईटस
Web Stories
Letest Post
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.