९० च्या दशकात खेळले जायचे खेळ जे आजच्या पिढीला कदाचित माहिती देखील नसतील त्यांना नक्की माहिती करून द्या..
Image : Pintrest
तुम्ही सुद्धा अशी सायकल किंवा टू व्हिलरची टायर मोकाट फिरवली असेल. कोणाचीतरी मागून आणून किवा चोरून
Image : Pintrest
संक्रातीला पतंग उडवणे म्हणजे पर्वणीच असायची.नाही दुकानातले पतंग मिळाले तर वर्तमानपत्राचे पतंग घरी बनवून उडवायचे.
Image : Pintrest
शाळेतून घरी न जाता शेतात राबणाऱ्या आई वडिलांसाठी शाळेतून शेतात पळायचे.मग असे लाड व्हायच्या त्याला तुलना नाही.
Image : Pintrest
मोठ्या दादाला घोडा करून त्याच्या पाठीवर बसायचे आणि चल रे घोड्या राजकुमारीला घेऊन असे म्हणायचे हे प्रत्येकाने अनुभवले असेल.
Image : Pintrest
मुलींचा सर्वात आवडता खेळ दोरी उड्या कारण याला कोणी लागत नसे आपण आणि एक दोरी असली कि झाला खेळ सुरु...
Image : Pintrest
भोवरा हातावर घ्यायला पण कसब लागायचे भोवऱ्याचा डाव रंगला कि रंगला मग कोण कोणाला हरवतोय यात आख्खा दिवस कधी निघून जायचा ते समजायचं नाही..
Image : Pintrest
सायकल शिकताना कितीदा गुडघे फोडून घ्यायचो आपण,कोणाचीतरी मागून नाहीतर त्याच्या परस्पर आणलेली सायकल त्यावेळी विमानापेक्षा मौल्यवान वाटायची.
Image : Pintrest
जो दुसऱ्यांना इज्जत देतो तोच खरा इज्जतदार असतो.कारण माणूस तेच दुसऱ्याला देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे.
Image : Pintrest