WhatsApp Pink Theme असा मेसेज सोशल मिडीया वरती फिरताना दिसतोय कदाचित तो तुम्हाला देखील आला असेल आणि तुम्हाला आला असेल तर सावधान! हा मेसेज असे सांगतो कि Whatsapp ची पिंक थीम असलेली आवृत्ती आली आहे ती डाऊनलोड करून घ्या आणि आपण इथेच फसतो.जाणून घेऊया हा मेसेज आहे तरी काय ?
WhatsApp Pink Theme क्लिक केल्यास काय होते ?
WhatsApp Pink Theme हे एक malicious app आहे ते तुम्ही डाऊनलोड करून आपली थीम गुलाबी रंगात बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा हे app तुमचा बँकिंग तपशील, OTP, फोटो आणि संपर्क यांसारखा डेटा चोरू शकतो.
असे दिसून आले की, ‘WhatsApp पिंक स्कॅम’ हे काय नवीन नाही. इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी एप्रिल 2021 मध्ये हा प्रकार उघड केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिस सायबर क्राईम विंगने देखील वापरकर्त्यांना याबद्दल सतर्क करणारे एक ट्विट शेअर केले आणि मार्गदर्शक तत्त्वे शेअर केली आहेत.
*… WHATSAPP PINK -A Red Alert For Android Users …*'
— NORTH REGION CYBER POLICE CRIME WING (@north_mum) June 16, 2023
*… व्हॉट्सॲप पिंक Android वापरकर्त्यांसाठी रेड अलर्ट …*
*…व्हाट्सएप गुलाबी (पिंक) Android उपयोगकर्ताओं के लिए एक रेड अलर्ट…*#CyberSafeMumbai
REGARDS,
NORTH REGION CYBER POLICE STATION,
CRIME BRANCH, CID, MUMBAI pic.twitter.com/viTbVrcWrn
WhatsApp Pink Theme सारख्या घोटाळ्यांपासून सुरक्षित कसे राहायचे?
अशा घोटाळयापासून सावध राहण्यासाठी सोशल मिडीयावर आलेल्या कोणत्याच अशा link वरती क्लिक करू नका ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही.अप्लिकेशन डाउनलोड करायची असतील तर ती फक्त Google Play Store सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून डाउनलोड करा.
आयफोन वापरकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण Apple अज्ञात स्त्रोतांकडून app डाउनलोड करण्याची परवानगीच देत नाही.
हे हि वाचा – हा माणूस विमानात Boeing 727 मध्ये राहतो.
तसेच, अनोळखी वेबसाइट किंवा अज्ञात लोकांनी पाठवलेल्या एपीकेवरून फाईल्स इन्स्टॉल करणे टाळा. मेसेज फॉरवर्ड करणारा तुमचा मित्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी व्हॉट्सअॅपवरील ‘फॉरवर्डेड’ लेबल उपयोगी पडू शकते किंवा तो इतर कुठूनतरी आला आहे. का हे नीट तपासा. कोणत्याही आमिषांना बळी पडू नका.जसे कि TATA ग्रुप ची anniversary आहे म्हणून 100 GB data free हा मेसेज 5 जनांना पाठवा वगैरे ..
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा..
WhatsApp Pink Theme कसे अनइंस्टॉल करायचे ते येथे आहे
WhatsApp Pink कसे अनइंस्टॉल करण्यासाठी WhatsApp मधील ‘लिंक केलेल्या डिव्हाइसेस’ विभागातून सर्व संशयास्पद app. अनलिंक करा. इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चच्या अहवालानुसार तुम्ही एकदा WhatsApp पिंक इन्स्टॉल केल्यानंतर, app इंस्टॉल केलेल्या app च्या लिस्ट मधून ते हाईड होऊ शकते.
तुम्हाला ते शोधायचे असल्यास, तुमच्या फोन सेटिंग्ज मधून ‘Apps’ विभागात जा, गुलाबी लोगोसह ‘WhatsApp पिंक’ शोधा आणि अनइंस्टॉल बटण दाबा. काहीवेळा, अशा app ना कोणतेही नाव नसते, म्हणून आपण ते देखील अनइंस्टॉल केल्याची खात्री करा.
हे हि वाचा – Love Marriage का टिकत नाहीत ? काय भन्नाट सांगितलंय…
❌🎈Pink whatsapp link🎈❌
कोणाकडून क्लीक झाली असल्यास खालील कृती लगेच करा.
⤴️Setting मध्ये जा.
⤴️App किंवा App management मध्ये जा.
⤴️pink (गुलाबी रंगाचा)आयकॉन असलेले व्हाट्सप शोधा.
⤴️त्यात जाऊन clear data आणि clear cashe करा.
नंतर ते गुलाबी रंगाचे व्हाट्सउप uninstall करा.
⤴️शेवटी आपण ज्या ब्राऊसर वरून अँप डाउनलोड केले तेथील history clear करा.
FAQs
WhatsApp Pink हे काय आहे?
WhatsApp Pink हे एक malicious app आहे. हे app तुमचा बँकिंग तपशील, OTP, फोटो आणि संपर्क यांसारखा डेटा चोरू शकतो.
WhatsApp Pink कसे अनइंस्टॉल करायचे?
पहिले तुमच्या Setting मध्ये जा.
App किंवा App management मध्ये जा.
pink (गुलाबी रंगाचा)आयकॉन असलेले व्हाट्सप शोधा.
त्यात जाऊन clear data आणि clear cashe करा.
नंतर ते गुलाबी रंगाचे व्हाट्सउप uninstall करा.
शेवटी आपण ज्या ब्राऊसर वरून अँप डाउनलोड केले तेथील history clear करा.
WhatsApp Pink app अगोदरच इंस्टॉल असेल तर काय करायचे?
WhatsApp Pink app अगोदरच इंस्टॉल असेल तर ते लगेच आपल्या फोन मधून अनइंस्टॉल करा.
Digital Facts : Exposing Ultimate Guide डिजिटल वर्ल्ड बद्दल समजून घेण्यासाठी.
Do You Know : मोठ्या डोक्याची मुले अधिक हुशार असतात का?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.