Bokya Satbande : बोक्या सातबंडेच्या मुंबई-पुण्यातील प्रयोगाला बालकांसह पालकांचाही उत्तम प्रतिसाद
ज्येष्ठ अभिनेते प्रभावळकरांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘बोक्या सातबंडे’ या पुस्तकावर आधारलेलं Bokya Satbande रंगभूमीवर . मुंबई-पुण्यातील बालक अणि पालक यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगाला मुलं दाद देत होती नाटकाच्या शेवटी तर मुले रंगमंचावर आली आणि पालक हौशेने आपल्या मुलासह आनंद लुटताना दिसली.
शिवाजी मंदिर, दादर मुंबईतील “बोक्या सातबंडे” च्या पाहिल्या प्रयोगाला अभिनेत्री भारती आचरेकर, गायिका राणी वर्मा याची उपस्थिती लक्षणीय ठरली! अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या Bokya Satbande या नाट्य रुपांतर डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.
नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेट ची संकल्पना आणि उभारणी केलेली आहे. दृष्य संकल्पना प्रणव जोशी, प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची आहे.
आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये आहे. त्याच्या जोडीला यश शिंदे, सायली रामदास रामेश्वरी, ओंकार यादव, स्वाती काळे, सौरभ भिसे, शीवांश दीप्ती प्रणव जोशी आदि कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरतात. पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतोय.
नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं ( Bokya Satbande ) ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा असल्याचं मत दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
दिग्दर्शक दीप्ती जोशी यांच्या म्हणण्यानुसार नाटकातील Bokya Satbande चे कारनामे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरावेत असे असून, नेहमीच सावध राहून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवल्यास येणाऱ्या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करता येऊ शकतो असं काहीसं सांगणारे आहेत.
आणखी वाचा….
देवदत्त नागे प्रभास सोबत Adipurush मध्ये भगवान हनुमानाची भूमिका करतोय
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.