Chandrayaan 3 मोहीमकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते ते अखेर 14 जुलै रोजी पार पडले. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी फॅटबॉय रॉकेट LMV-3-M-4 चंद्राकडे झेपावले.आणि अवघ्या 16 मिनटात पृथ्वीच्या कक्षेत शिरले.आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात झाली अवघ्या जगाने तोंडात बोट घालावे अशी कामगिरी पार पडली.
जवळ जवळ 40 दिवसानंतर म्हणजे २३ किंवा 24 ऑगस्टला प्रोपल्शन मॉड्यूल पासून वेगळे होऊन लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.
लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर वेगवेगळे प्रयोग करतील त्यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग ,माती आणि धुळीचे अध्ययन आणि विश्लेषण केले जाईल. प्रोपल्शन मॉडेल ऑर्बिटची भूमिका बजावेल.
Chandrayaan 3 चे लॉन्चिंगसह सर्व बजेट हे सुमारे ६१५ कोटीचे आहे.चार वर्षापूर्वी चांद्रयान -2 वरती ६०२ कोटी रुपये खर्च झाला होता.पण त्याच्या लॉन्चिंग साठी अतिरिक्त ३७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
हे हि वाचा – Uniform Civil Code Advantages Disadvantages : समान नागरी कायदा आहे तरी काय?
Chandrayaan 3 कसे काम करेल?
स्टेप 1
सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून ४५ मिनिटांनी फॅटबॉय रॉकेट LMV-3-M-4 चंद्राकडे झेपावले.
स्टेप 2
16 मिनटात पृथ्वीच्या कक्षेत शिरले.कक्षेत वळले आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात झाली.
स्टेप 3
पुढचे 22 दिवस ते पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत ते प्रदक्षिणा घालत राहील.
स्टेप 4
या 22 दिवसात म्यान्युव्हरच्या मदतीने ते आपली कक्षा रुंदावेल आणि पृथ्वीला 5 प्रदक्षिणा घालेल.
स्टेप 5
त्या 22 दिवसानंतर ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरु करेल.
स्टेप 6
चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर ते स्थिरावेल आणि वळण घेईल.
स्टेप 7
पन्हा एकदा ते म्यान्युव्हरच्या मदतीने ते आपली कक्षा रुंदावेल आणि चंद्राला 5 प्रदक्षिणा घालेल.
स्टेप 8
चंद्रापासून 100 किलोमीटर लांब असताना प्रप्लोशन मॉड्यूल पासून विक्रम लँडर वेगळे होईल.
स्टेप 9
चंद्रावर उतरत असताना इंजिनच्या साह्याने लँडरचा वेग कमी कमी होत जाईल.
स्टेप 10
चंद्रावर उतरल्यानंतर विक्रम लँडरच्या घरगुंडीवरून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल.आणि रोव्हर पुढचे 14 दिवस चंद्राची रहस्ये उलगडेल.
यावेळेस भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवास स्पर्श केलेला असेल.ज्या भागाचे दर्शन आजपर्यंत रशिया, अमेरिका चीनला झाले नाही. ते यश भारताच्या पदरात पडलेले असेल.हे अभूतपूर्व यश भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल.
FAQ
Chandrayaan 3 चे लक्ष्य काय आहेत?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवने.
विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग आणि अन्वेषण करने.
पाण्याच्या चिन्हांसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण करने.
चंद्रावर रोव्हर उतरवण्याची भारताची क्षमता जगाला दाखवून देणे.
रोव्हरला म्हणजे काय?
एक चारचाकी रोव्हर जो सुमारे 100 किलोग्रॅम (220 पौंड) वजनाचा आणि 1.5 मीटर (5 फूट) लांब आहे. रोव्हर कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर आणि ड्रिलसह विविध वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
Chandrayaan 3 साठी टाइमलाइन काय आहे?
चांद्रयान 3 मोहीम एक वर्ष चालेल अशी अपेक्षा आहे. रोव्हर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षभरात वैज्ञानिक प्रयोग केले जाण्याची अपेक्षा आहे.
चांद्रयान 3 चे बजेट किती आहे?
चांद्रयान 3 चे बजेट सुमारे 615 कोटीआहे. यामध्ये अंतराळयान, रोव्हर आणि वैज्ञानिक उपकरणांची किंमत समाविष्ट आहे.
चांद्रयान 3 चे महत्त्व काय आहे?
चांद्रयान 3 हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे आणि चंद्रावर रोव्हर उतरवण्याची त्याची पहिली मोहीम आहे. चांद्रयान 3 ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची भारताची पहिली मोहीम आहे.
हे हि वाचा – Uniform Civil Code Advantages Disadvantages : समान नागरी कायदा आहे तरी काय?
हे हि वाचा – Oh My God 2 ट्रेलर लॉन्च : परेश रावल यांनी का नाकारला हा सिनेमा ?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.