CHATRAPATHI – ट्रेलर रिलीज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एस एस राजामौली यांच्या तेलुगु ब्लॉकबस्टर  ‘ CHATRAPATHI ‘ या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे आणि प्रेक्षक आतुरतेने या हिंदी रिमेक छत्रपती या चित्रपटाची वाट पाहत आहेत. याचे कारण हि तसेच आहे या चित्रपटातून  बेल्लमकोंडा श्रीनिवास बॉलिवूड मध्ये एन्ट्री करतोय. मंगळवारी या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित  झाला. ट्रेलर पाहून असे वाटते कि छत्रपती नक्की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

Chatrapati
Chatrapati : Bellamkonda Sai Srinivas

CHATRAPATHI हा चित्रपट एक व्यावसायिक चित्रपट असून यामध्ये Entertenment, Action, Romans ठासून भरलेला असावा. मूळ तेलुगू चित्रपटाच्या कथेवर  छत्रपती हा चित्रपट असून हिंदी प्रेक्षकांसाठी थोडेफार बदल केले आहेत. आहे,त्यासाठी बेल्लमकोंडा श्रीनिवासने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते.

CHATRAPATHI चित्रपटाचा हिंदी रिमेक व्हीव्ही विनायक दिग्दर्शित केला आहे. पेन स्टुडिओचे डॉ. जयंतीलाल गडा यांची हि निर्मिती आहे. चित्रपटाची पटकथा ज्यांनी मूळ तेलगू चित्रपटाची कथा लिहिली होती ते विजयेंद्र प्रसाद यांनीच लिहिली आहे. संगीत तनिष्क बागची यांनी दिले आहे.

नुश्रत भरुच्चा हि  बॉलीवूड अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये शरद केळकर, शिवम पाटील, साहिल वैद,आशिष सिंग, राजेंद्र गुप्ता, स्वप्नील अमित नायर, आरोशिका डे, मोहम्मद मोनाजीर, आणि इतर कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

CHATRAPATHI हा मूळ राजा मौली दिग्दर्शित तेलगु चित्रपट ब्लॉकबस्टर होता.त्यामुळे आता आशा आहे कि त्याचा हिंदी रिमेक कितपत यश संपादन करतोय..बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि  नुश्रत भरुच्चा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय का ?

CHATRAPATHI हा चित्रपट 12 मे २०२३ ला रिलीज होतोय.

मुंबई मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Read more..
श्रीनिवास बेलमकोंडानुसरत भरुचा की छत्रपति
Abraham Lincoln 10 Interesting Facts ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

Leave a comment