Delhi Assembly Elections : साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस) शनिवारी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहेत.
Delhi Assembly Elections साठी या भागातील उमेदवार असतील
महाराष्ट्रातील निवडणुकीत एनडीए सोबत युती करणाऱ्या राष्ट्रवादीने दिल्ली निवडणुकीत मात्र स्वतंत्रपणे 11 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. बुराडी, मंगोलपुरी, बडली, छतरपूर, सीमापुरी, ओखला, गोकुळपुरी, संगम विहार, लक्ष्मीनगर, चांदणी चौक, आणि बली मारान या भागांमधून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
बडली मतदारसंघातून दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्याविरोधात मुलायम सिंह यांना, चांदणी चौक मतदारसंघातून खालिद उर रहमान, बुराडी मतदारसंघातून रतन त्यागी, बली मारान मतदारसंघातून मोहम्मद हारून, आणि छतरपूरमधून नरेंद्र तंवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे हि वाचा – Home Ministry : महाराष्ट्र मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर: कोणाला कोणते खाते मिळाले?
तसेच ओखलामधून इम्रान सैफी, मंगोलपुरीमधून खेम चंद, लक्ष्मीनगरमधून नमहा, सीमापुरीमधून राजेश लोहीया, गोकुळपुरीमधून जगदीश भगत, आणि संगम विहारमधून कमर अहमद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
NCP लढवणार स्वतंत्र निवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी सांगितले होते की, पक्षाने यापूर्वी दिल्लीतील निवडणुका लढवल्या आहेत आणि यावेळीही लढविणार आहे. भाजपसोबत युतीबाबत चर्चा झाली होती, मात्र आता यादी जाहीर केल्यानंतर पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम आदमी पक्षाने 70 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने आतापर्यंत दोन याद्यांमधून 47 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे.
दरम्यान, असे सांगितले जात आहे की, असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाकडून 2020 च्या उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते. शाहरुख पठाण सध्या तिहार जेलमध्ये आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आणखी एक 2020 च्या दिल्ली दंगलीतील आरोपी आणि माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन, ज्यांनी एआयएमआयएममध्ये प्रवेश केला आहे, त्यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते देखील सध्या तिहार जेलमध्ये आहेत.
भारतीय जनता पक्षाने मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.