शकुनीमामाचे पात्र अजरामर करणारे Gufi Paintal यांचे निधन
बी.आर. चोप्रा यांची सुपरहिट मालिका महाभारतातील शकुनीमामा हे महत्वाचे पात्र आपल्या अभिनयाने जिवंत करणारे अभिनेते Gufi Paintal यांचे सोमवारी 5 जून रोजी सकाळी मुंबईच्या अंधेरी येथील रुग्णालयात निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.
गुफी पेंटल यांना मूत्रपिंड आणि ह्रदयाचा आजार होता.गुफी पेंटल यांचा पुतण्या हितेन पेंटल आणि गुफी पेंटल याचे सहकलाकार सुरेन्द्र पाल यांनी त्याच्या मृत्यूची बातमी दिली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुफी पेंटल यांची कारकीर्द
गुफी पेंटल आपल्या अभिनयाची कारकीर्द 1975 मध्ये ‘रफू चक्कर’या चित्रपटातून केली.त्यानंतर ते 80 च्या दशकात अनेक टिव्ही मालिका आणि चित्रपटातून दिसले पण त्याना खरी ओळख निर्माण करून दिली ती1988 मध्ये बी आर चोप्रा यांच्या सुपरहिट शो ‘महाभारत’ने , महाभारतात शकुनीची भूमिका साकारल्यानंतर गुफी पेंटल हे घराघरात पोहोचले.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी गुफी पेंटल लष्करात होते. 1962 मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होते, तेव्हा ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते . युद्धाच्या काळातही कॉलेजमध्ये लष्कराची भरती सुरू होती. तेव्हा त्यांना नेहमी लष्करात भरती व्हावे असे वाटायचे.. शेवटी त्यांची चीन सीमेवरील आर्मी आर्टिलरीमध्ये पोस्टिंग झाली. .”
“सीमेवर मनोरंजनासाठी टीव्ही आणि रेडिओ नव्हता, त्यामुळे सर्व सैनिक सीमेवर रामलीला करायचे. रामलीलामध्ये गुफी सीतेची भूमिका करत असत आणि रावणाच्या वेशात एक व्यक्ती स्कूटरवर येऊन त्यांचे अपहरण करत असे.
गुफिना अभिनयाची आवड होती, त्यातून त्यांनी काही प्रशिक्षण घेतले,” गुफी पेंटल 1969 मध्ये मुंबईत आले आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर एके दिवशी बीआर चोप्राने त्यांना महाभारतमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली.
गुफी पेंटलच्या म्हणण्यानुसार,ते महाभारतातील शकुनीच्या पात्रासाठी योग्य चेहरा शोधत होता आणि त्यांनी या शोसाठी सर्व पात्रांचे ऑडिशन दिले होते. गुफी पेंटलने अखेरीस शकुनीच्या भूमिकेसाठी तीन जणांची निवड केली पण शोची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मासूम रझाने त्याला शकुनीची भूमिका करण्याचा सल्ला दिला.
Read more: Gufi Paintal : महाभारतातील शकुनीमामा अनंतात विलीनकॉमेडीचा बादशाह Ashok Saraf झाले ७६ वर्षांचे
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.