मार्केटमध्ये Fake Currency बनावट चलनी नोटांचा प्रसार वाढल्यामुळे लोक कोणतीही नोट स्वीकारताना धास्तावले आहेत. व्यापारी आणि सामान्य जनता बनावट चलन ओळखण्याच्या अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹१०० च्या नोटेसंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेऊ.
Fake Currency बाबत आर बी आय चा इशारा
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या प्रयत्नांनंतर, RBI ने अलीकडेच बनावट पाचशे रुपयांच्या नोटा प्रचलनात असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत RBI ने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
तेलंगणामध्ये नुकतीच बनावट दोनशे रुपयांच्या नोटांची घटना उघडकीस आली. फसवणूक करणाऱ्यांनी साध्या रंगीत झेरॉक्सचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या आणि प्रचलनात आणल्या. त्यामुळे ₹१०० च्या नोटांमध्येही बनावटपणाचा धोका निर्माण होऊ शकतो, या शंकेने आर बी आय ने ₹१०० च्या खऱ्या नोटांच्या सुरक्षात्मक वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली आहे.
हे हि वाचा – लहान बाळांना काचेत का ठेवतात ? ते धोकादायक असते का ?
₹१०० ची नोट ही भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी नोट आहे. अलीकडे आर बी आय ने ₹१०० च्या बनावट नोटांविषयी महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. बनावट नोटा दिसायला खऱ्या चलनी नोटांसारख्याच वाटत असल्याने प्रथमदर्शनी त्यांना ओळखणे कठीण जाते. त्यामुळे आर बी आय ने खऱ्या नोटा ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
खऱ्या नोटा कशा ओळखायच्या ?
खऱ्या ₹१०० च्या नोटेत वॉटरमार्कच्या बाजूला असलेल्या उभ्या पट्टीत एक फुलांच्या डिझाइनचा समावेश असतो. वॉटरमार्कच्या खिडकीत महात्मा गांधी यांचे छायाचित्र आणि “१००” असा आकडा असतो. या दोन वैशिष्ट्यांवरून नोट खरी आहे का, हे ओळखता येते.
याशिवाय, खऱ्या ₹१०० च्या नोटेतील सुरक्षा पट्टीवर “भारत” आणि “RBI” अशी अक्षरे कोरलेली असतात. नोटेचा कोन बदलल्यावर ही अक्षरे निळसर आणि हिरव्या रंगात परिवर्तित होतात. वर्टिकल पट्टी आणि महात्मा गांधी यांच्या छायाचित्राच्या मधल्या जागेत “RBI, 100″ असे कोरलेले असते.
जर यापैकी कोणतेही वैशिष्ट्य नोटेत नसेल, तर ती नोट बनावट असल्याचे सिद्ध होते. २०१६ च्या नोटबंदीच्या काळानंतर बनावट चलनी नोटांच्या संख्येत वाढ झाली असून, ती एक गंभीर समस्या बनली आहे.
बनावट नोटा, विशेषतः ₹१०० च्या नोटा, मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याच्या वारंवार तक्रारी आढळतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना रोज त्रास होतो. अधिकृत अहवालांनुसार ही समस्या खरोखरच चिंताजनक बनली आहे. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि लोकांना अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आर बी आय हे मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, बनावट चलनी नोटा ओळखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. लोक जागरूक झाले तरच फसवणूक करणाऱ्यांचे कारस्थान थांबेल. त्यामुळे प्रत्येकाने RBI च्या सूचनांचे पालन करावे.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.