इंदुरीकर महाराज यांना अटक होणार काय ?

इंदुरीकर महाराज नेहमीच त्यांच्या कीर्तनाच्या वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात.आणि त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे ते कित्येकदा अडचणीत सुद्धा आले आहेत.असेच एक प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे.बघुया काय आहे ते प्रकरण..

इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराज Image : Google

इंदुरीकर महाराज यांना अडचणीत आणणारे प्रकरण आहे तरी काय ?

सम तिथीला जर स्त्री सोबत शारीरिक सबंध ठेवले तर मुलगा होतो आणि सबंध जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री सबंध जर अशीव् वेळेला झाला तर होणारी संतती ही नालायक आणि खानदान मातीत घालणारी जन्माला येते. “टाइमिंग हुकलं की कॉलिटी खराब” असं विधान केलं होतं प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आणि याच विधानामुळे अडचणीत आलेले इंदुरीकर महाराज शेवटी कंटाळून किर्तन सोडून शेती करायला निघाले होते.

हे प्रकरण आहे तीन वर्षापूर्वीचे म्हणजे 2020 मधील पण तीन वर्षानंतर सुद्धा हे प्रकरण इंदुरीकर महाराज यांची पाठ सोडायला तयार नाही.याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये खटला सुरू होता आणि निकाल इंदुरीकर महाराजांच्या विरोधात देत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

इंदुरीकर महाराज यांना खरंच अटक होऊ शकते का?

तीन वर्षांपासून पेंडिंग असलेल्या या प्रकरणात इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. इंदुरीकरांच्या किर्तनांमध्ये महिलांविषयी अपमान जनक विधान असतात म्हणून ते कित्येकदा अडचणीत देखील येतात मात्र सध्या चर्चेत असलेले हे प्रकरण इंदुरीकर यांना चांगलंच जड जाणार दिसतंय इतकं की त्यांना अटकही होण्याच्या शक्यता आता वर्तवली जात आहे.

हे संपूर्ण प्रकरण आहे 2020 मधले इंदुरीकर यांनी शिर्डीत कीर्तन करताना लिंगभेदावर भाष्य केलं आणि त्याचे व्हिडीओ यु ट्युबवर प्रसिद्ध केले. ते असं म्हणाले होते की सम तारखांनाच म्हणजेच 2,4,6,8,10 अशा सम तारखेला जर शरीर संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखांना म्हणजे 3,5,7,9, या तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते आणि स्त्री सबंध अशीव् वेळला झाला तर ती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होते. “टायमिंग हुकलं की कॉलिटी खराब” असं सांगत त्यांनी या विधानाला पुराव्याची जोड सुद्धा दिली.

इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराज Image : Google

इंदुरीकर महाराज यांनी काय पुरावा दिला ?

पुल्लष्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला म्हणून रावण, विभीषण आणि कुंभकर्ण जन्माला आले . तर आदिती ऋषींनी पवित्र दिवशी संग केला म्हणून त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला म्हणून भक्त प्रल्हाद जन्माला आला असे इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनात म्हटलं होतं

कोणी हरकत घेतली ?

इंदुरीकर महाराज यांनी एकदा नव्हे तर त्या दरम्यानच्या संगमनेर, रायगड, बीड या ठिकाणच्या किर्तनात देखील अशाच प्रकारची अशास्त्रीय विधान जाहीरपणे केली.त्यांच्या या विधानांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हरकत घेतली इंदुरीकरांनी लिंगभेदाबाबत केलेलं विधान हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पी.सी.पी.एन.डी.टी. म्हणजेच गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन केले असल्याचा आरोप अनिसने केला होता.

त्यानुसार अनिसने अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे 17 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या या समितीच्या वतीने सदर प्रकरणात इंदुरीकर यांच्या विरोधात कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतला होता.मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तसे पुरावे जिल्हा शल्यचकिस्तकांकडे सादर केले. त्यानंतर इंदुरीकर यांच्या स्टेटमेंटचा आधार घेत पी.सी.पी.एन.डी.टी. सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला.

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

18 फेब्रुवारी 2020 रोजी इंदुरीकर यांनी स्पष्टीकरण देऊन जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाअनिसच्या वतीने पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याअंतर्गत इंदुरीकर यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3 ) अंतर्गत याचिका दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानंतर इंदुरीकर यांनी सेशन कोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला. परंतु त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेलं 16 जून 2023 रोजी च्या सुनावणीमध्ये इंदुरीकर महाराजांविरुद्ध कायद्यान्वये खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी काढला होता.

हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी कायम ठेवला म्हणजेच खंडपीठाने इंदुरीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच इंदुरीकर महाराजांची खटला रद्द करण्याची विनंती मान्य करणारा नगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला आणि इंदुरीकरांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुभा देखील दिली आहे.

पण खंडपीठाच्या आदेशामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्या जमा आहे. जर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला तर तो कोणत्या तरतुदी अंतर्गत होऊ शकतो? गर्भजल आणि गर्भलिंगनिदान तंत्र, नियमन व गैरवापर प्रतिबंध कायदा 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला. 2002 मध्ये त्यामध्ये सुधारणा झाली आणि गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 अशा नावाने हा कायदा ओळखला जाऊ लागला.

सदर कलमानुसार गर्भलिंगनिदान निवडी बाबत छापील पत्रक संवाद मेसेज फोन किंवा इंटरनेट द्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जाहिरात करण्यासंबंधी म्हणजेच हे केल्याने मुलगा किंवा ते केल्याने मुलगी होईल अशा संदर्भात कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा प्रचार करणं हा कलम 22 कलम 22 ( 3 ) नुसार गुन्हा ठरतो. इंदुरीकरांवरील गुन्हा सिद्ध झाला तर कलम 22 आणि कलम 22 ( 3 ) चा भंग म्हणून इंदुरीकरांना तीन वर्षांची सत्ता मजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.

2020 चा व्हिडीओ पहा

इंदुरीकर महाराज यांची बाजू काय आहे ?

या संपूर्ण प्रकरणात इंदुरीकर यांच्या वकिलांनी अशी बाजू मांडली आहे की आयुर्वेदातही असे काही दाखले दिले आहेत की समसंख्येच्या तिथीला स्त्री पुरुष संबंध आले तर पुत्रप्राप्ती होते आणि विषम संख्येच्या तिथीला संबंध आले तर कन्यारत्न प्राप्त होते. इंदुरीकरांचे वक्तव्य हे प्राचीन हिंदू ग्रंथांवर आधारित आहे इंदुरीकर महाराज जाहिरात करते नसून ते समाज प्रबोधन करते आहेत.

त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्भलिंग निदान अथवा चाचणी कायद्यात अभिप्रेत असलेली जाहिरात केलेली नाहीये आणि त्यामुळे सदर कलम 22 चे उल्लंघन होत नाही. या आधारावर इंदुरीकर हे उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात कारण इंदुरीकर यांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुभा देण्यात आलेली आहे.

या चार आठवड्याच्या काळात अटकपूर्वक जामीन मिळून सेफ होण्याचा प्रयत्न ते करतील असं कायदे तज्ञ यांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच त्या अगोदरच सर्वोच्च न्यायालयात अनिसच्या वतीने खबरदारी म्हणून सावधान पत्र दाखल करण्यात येणार आहे. काही दिवसात यावर काय निकाल येतो हे कळेलच पण या प्रकरणावरून लक्षात घ्यायला लागेल की अमुक दिवसात किंवा अमुक तारखेला संबंध ठेवल्याने मुलगा किंवा मुलगी जन्माला येते हि एक खुळी समजूत आहे.

याबाबत भाष्य केल्याने इंदुरीकर गुन्हा दाखल होऊ शकतो का आणि तसं झाल तर त्यांना अटक होऊ शकते. 2020 मध्ये हे प्रकरण खूप चिघळल होतं तेव्हा इंदुरीकर म्हणालेले या संपूर्ण प्रकरणाचा मला त्रास झालाय अजून दोन दिवस बघेल अन्यथा किर्तन सोडून शेती करेन..

या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Emergency Movie : 24 नोहेंबर ला आणीबाणी येणार

आणीबाणी : 25 जून 1975 ज्या दिवशी संविधानाचे मूलभूत अधिकार संपुष्टात आले.

Leave a comment

म्हणून काढला जातो या पक्ष्याचा टॅटू Good Habits For Kids : लहानपणापासूनच मुलांना लावा या सवयी माणसातला “देवमाणूस” या कारणासाठी विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालतो. हे Bollywood actors आपल्या तारुण्यात असे दिसत होते. चहाप्रेमींसाठी काही कडक,फक्कड चहाचे प्रकार पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ या डासांमुळे पसरतो हा वायरस! अशी घ्या काळजी. Who is this tall man seen with Sachin Tendulkar? बोल्ड, बिंदास्त, आणि ब्यूटीफूल सई ताम्हणकर
म्हणून काढला जातो या पक्ष्याचा टॅटू Good Habits For Kids : लहानपणापासूनच मुलांना लावा या सवयी माणसातला “देवमाणूस” या कारणासाठी विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालतो. हे Bollywood actors आपल्या तारुण्यात असे दिसत होते. चहाप्रेमींसाठी काही कडक,फक्कड चहाचे प्रकार पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ या डासांमुळे पसरतो हा वायरस! अशी घ्या काळजी. Who is this tall man seen with Sachin Tendulkar? बोल्ड, बिंदास्त, आणि ब्यूटीफूल सई ताम्हणकर