सुपरस्टार रजनीकांत म्हंटल कि अॅक्शन-थ्रिलर-ड्रामा आलाच. चाहते त्याची आतुरतेने वाट बघतात.अशाच एका नवीन चित्रपटाच्या रिलीजची तारीख नुकतीच जाहीर झाली.
Jailer रिलीज तारीख
सगळ्या जगामध्ये Fans असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार आपल्या आगामी Jailer चित्रपटातून 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. असे नुकतेच जेलर चित्रपटाचे प्रोडक्शन हाउस सन पिक्चर्सने आपल्या ट्विटरवर अकाऊंट आणि YouTube channel वर या चित्रपटाचा टीझर शेअर करून जाहीर केले. ४८ सेकंदाच्या या टीझरचा लुक तुम्ही पाहिलात का ?
सन पिक्चर्स प्रोडक्शन हाउस च्या अंडर बनलेल्या जेलर ची कथा आणि दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांचे असून संगीत अनिरुद्ध रविचंदरचे आहे. मागच्या वर्षी रजनीकांतचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. त्याचा या आगोदरच Annaatthe या चित्रपटाने ढोबळ कथा आणि हलकाफुलका ड्रामा यामुळे प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यामुळे येत्या 10 ऑगस्ट रोजी येणाऱ्या रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.
डॉक्टर या चित्रपटातून नावारूपाला आलेल्या लेखक दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार प्रेक्षकांना नाराज करणार नाहीत असे तूर्तास टीझर पाहिल्यावर तरी वाटते. जेलर मध्ये स्टार कलाकारांची मोठी फौज आहे.मल्याळम स्टार मोहनलाल आणि कन्नड स्टार शिवराजकुमार प्रमुख भूमिकेत आहेत. तर बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ एका अज्ञात परंतु मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर तमन्ना भाटिया, सुनील, रम्या कृष्णन, रेडिन किंग्सले आणि विनायकन हे देखील जेलर मध्ये आहेत. जेलर 10 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
#Jailer is all set to hunt from August 10th
CHATRAPATHI – ट्रेलर रिलीज
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.