
January 26 Republic Day 2025 : संपूर्ण देश उत्साहाने व बहुप्रतीक्षित प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. हा एक राष्ट्रीय सण आहे जो दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
हा दिवस भारतासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी भारत प्रजासत्ताक झाला. हा दिवस देशातील लोकशाही स्थापन होण्याचा वारसा जपत आहे.
दिल्लीतील कर्तव्यपथावरील आयोजन:
देशभरात जल्लोषाने साजऱ्या होणाऱ्या या दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेडचे आयोजन केले जाते. तसेच, राष्ट्रपती या शुभदिनी ध्वजवंदन करतात.
हे हि वाचा – प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि भारतीय तिरंग्यात लपलेले संदेश जाणून घ्या..
परंतु नागरिकांमध्ये नेहमीच हा प्रश्न उपस्थित होतो की, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वज का फडकावतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती का फडकावतात? यामागे एक महत्त्वाचा इतिहास व भेद आहे – ध्वज फडकावणे व ध्वज उलगडणे यामध्ये स्पष्ट फरक आहे.
January 26 Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन रविवार दिनांक २६ जानेवारी ला साजरा करणार आहे. ७५ वर्षांच्या प्रजासत्ताक प्रवासाच्या पूर्णत्वाच्या या ऐतिहासिक क्षणाला अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी सरकार नियोजन करत आहे.
प्रथेप्रमाणे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दिवशी ध्वजवंदन करतील. राष्ट्रीय ध्वज खांबाच्या शिखरावर बांधलेला असतो आणि राष्ट्रपती दोरी ओढून तो उंच फडकवतात.
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनातील फरक :
स्वातंत्र्य दिनी ध्वज उलगडला जातो, तर प्रजासत्ताक दिनी तो फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनी ध्वज खालून वर ओढला जातो, तर प्रजासत्ताक दिनी तो खालच्या बाजूने सोडला जातो.
स्वातंत्र्य दिनी ब्रिटीशांचा ध्वज खाली ओढून भारतीय ध्वज उंच फडकवला गेला होता, तर प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा जयघोष असल्याने ध्वज खाली उलगडून सन्मानाने फडकावला जातो.
इतिहासातील महत्त्वाचा क्षण:
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वज फडकावतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती. यामागील कारण असे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देशप्रमुख होते.
मात्र, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली. त्यामुळे या दिवशी ध्वजवंदनाची जबाबदारी राष्ट्रपतींकडे दिली जाते. ही परंपरा आजही कायम आहे.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.