MPSC TOPPER दर्शना पवार च्या हत्येमागील तपास आता काही गोष्टी उघड करत आहे. दर्शना पवारच्या हत्येतील आरोपी राहुल हांडोरे याला 21 जूनला मुम्बई मधून रात्री उशिरा अटक करण्यात आली.
दर्शना पवार आणि राहुल हांडोरे दोघंही 12 जूनपासून बेपत्ता होते.18 जूनला राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शनाचा मृतदेह सापडला होता. राहुल मात्र 12 तारखेपासून बेपत्ता होता.दर्शनाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट वरून दर्शनाचा खून जाळे असल्याचे समजताच राहुलवर संशयाच्या नजर फिरल्या आणि 21 जूनला मुम्बई मधून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.लग्नास नकार दिल्याने खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.
MPSC TOPPER दर्शना पवार
दर्शना पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती.नुकतेच दर्शनानं MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं. परिक्षेत पास झाल्यानंतर ती सत्कारासाठी पुण्यातील कोचिंग क्लास मध्ये आली होती. पण 10 जूनपासून तिचा तिच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता. त्यामुळे 12 जूनला तिचे कुटुंब पुण्यात आले आणि कोचिंग क्लासेस मध्ये चौकशी केली.
राहुल हांडोरे
राहुल हा मुळचा नाशिक जिल्हातल्या सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. वडील पेपर टाकण्याचे काम करतात.दर्शना प्रमाणेच राहुल सुद्धा गेली चार ते पाच वर्षे एमपीएससीची तयारी करत होता. पुण्यामध्ये कर्वे नगरला तो आपल्या लहानभावासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. पुण्यात तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस साठी पार्टटाईम जॉब करत होता. स्थानिक आभ्यासिकेत जाऊन तो एमपीएससीचा अभ्यास करायचा. 2023 ची एमपीएससीची प्रीलीमीनरी परिक्षा त्याने दिली होती. या परीक्षेत यश मिळेल अशी त्याला खात्री होती.
ओळख कशी झाली?
पोलिसांच्या माहितीनुसार दर्शना आणि राहुल यांची ओळख हि लहानपणापासुन आहे.दर्शनाच्या मामाचं घर आणि राहुलचं घर हे समोरासमोर असल्याने त्यांची लहानपणापासुन ओळख होती. त्यानंतर ते पुण्यातही एकमेकांच्या संपर्कात आले असावेत असा अंदाज आहे.
दर्शनाची आई काय म्हणाली ?
दर्शनाच्या आईने त्यांच्या कोणतीही मैत्री न्हवती त्यानेच तिचा घात केल्याचे म्हंटले आहे. माझी मुलगी गेली पण अजून धा मुलीचे असे होऊ नये.त्याला फाशीची शिक्षा व्हावी असे हि दर्शनाच्या आईने म्हंटले आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
MPSC TOPPER दर्शना पवार ची हत्या हि लग्नास नकार दिल्याने झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समजते.प्राथमिक पुराव्यानुसार राहुल हांडोरे प्रमुख आरोपी असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली असून लवकरच सविस्तर माहिती हाती येईल.
ग्रामीण पोलिसांनी योग्य तपास करावा- सुप्रिया सुळे
MPSC TOPPER दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापुर्वी हि घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा.
एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापुर्वी हि घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय…
— Supriya Sule (@supriya_sule) June 19, 2023
धोनीच्या CSK मध्ये वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळलेला क्रिकेटर चालवतोय बस
BPNL : भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड भरती सुरु
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.