प्रस्तावना
“Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024” महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबवण्यास उक्त संदर्भाधीन दि. 09 जुलै 2024 तिच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, सिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून “Mukhyamantri Yojana Doot” कार्यक्रम सुरू करण्यास या शासनाने मान्यता दिली आहे.
Mukhyamantri Yojana Doot या योजनेचे उद्दिष्टे
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता “मुख्यमंत्री योजना दूत” थेट ग्रामस्थांनपर्यंत नेमणे हे आहे.
Must read : Mukhyamantri Ladki Bahin Yojana : नवीन अपडेट्स
कार्यक्रमाची ठळक रूपरेषा
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाय आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “Mukhyamantri Yojana Doot” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील.
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे 50000 योजनादुतांची निवड करण्यात येईल.
मुख्यमंत्री योजना दुतास प्रत्येकी 10000 प्रति महिना एवढे मानधन देण्यात येईल.
निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दुता सोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही.
Must read : लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024- पात्रता
- वयोमर्यादा- 18 ते 35 वर्ष
- शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- संगणक ज्ञान असणे आवश्यक.
- उमेदवाराकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक.
- आधार कार्ड असणे आवश्यक.
- स्वतःच्या नावाचे बँक खाते असणे आवश्यक व ते आधार संलग्न असावे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024- आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजना दूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड.
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे कागदपत्रे व प्रमाणपत्र.
- आदिवासाचा दाखला.
- वैयक्तिक बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट साईज फोटो.
- हमीपत्र.
Must read : India Post GDS Recruitment 2024 : 44,200 हून अधिक जागा हि आहे शेवटची तारीख
Yojana Doot Bharti 2024 योजनादूतांचे महत्वाची कामे
- या भरती मध्ये निवड झालेले योजन दूत हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून, जिल्हा योजनांची माहिती नागरिकांना देतील.
- नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन, सांगितलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी या उमेदवारांवर बंधनकारक असेल.
- अर्जदार योजना दूत शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
- तसेच दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ते शासनाला ऑनलाईन अपलोड करतील.
- या पात्र उमेदवारांना गैरहजर राहिल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास, मानधन दिले जात नाही.
कशी असणार निवड प्रक्रिया?
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
येत्या १५ ऑगस्ट पासून येत आहे नवी कोरी विनोदी वेबसिरीज राम राम सरपंच तेव्हा आत्ताच Shatakshi Entertainment या Youtube Channel ला सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ..
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.