तुम्ही खाद्यपदार्थाचे शौकीन असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या पाककृतींमधून नवीन पदार्थ बनवायला आवडत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. Paneer Pasanda हा एक भारतीय पाककलेतील चविष्ट असा शाकाहारी पदार्थ आहे जो मलईदार, मसालेदार आणि नटी फ्लेवर्स आवडत असलेल्यांसाठी बरोबर आहे. या लेखात, आपण पाहुया तुम्हाला आवडणारी Paneer Pasanda रेसिपी…

तसं पाहिलं तर हि डिश मुघलाई पाककृती मध्ये मोडते. खास करून शाकाहारी लोकांसाठी हि डिश म्हणजे पर्वणीच असते.पण हीच जर घरच्या घरी बनवता आली तर..त्यासाठी आम्ही आहोत ना. पनीर पसंदा रेसिपी खूप सोप्पी आहे. खाली दिलेल्या काही सोप्प्या स्टेप तुम्ही follow केल्या कि तुम्ही सुद्धा हि डिश घरच्या घरी बनवू शकता आणि तिचा आनंद घेऊ शकता. तर, चला रेसिपीला सुरुवात करूया.
Paneer Pasanda रेसिपी साहित्य

पनीर पसिंदास सँडविच बनवण्यासाठी साहित्य
- तीनशे ग्रॅम पनीर
- चार टेबलस्पून मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर
- एक चम्मच अद्रक पेस्ट
- दोन टेबलस्पून काजू बदाम आणि पिस्ता बारीक कट करून
- एक टेबल स्पून बेदाणे पनीर पसिंदास सँडविच बनवण्यासाठी
पनीर पसिंदास ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य
- चार टोमॅटो
- दोन हिरव्या मिरच्या
- दोनशे ग्रॅम क्रीम
- दोन टेबलस्पून तेल
- थोडीशी कापलेली कोथिंबीर
- एक चम्मच अद्रक पेस्ट
- एक छोटी चम्मच कसुरी मेथी
- थोडासा हिंग
- अर्धा चमचा जिरे
- एक चमचा धने पावडर
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- पनीर सँडविच तळण्यासाठी तेल
सँडविच बनवण्याची कृती
स्टेप १

सर्वात प्रथम पनीरचे सँडविच बनविण्यासाठी अर्धा इंच रुंदी घेऊन पनीरचे त्रिकोणी तुकडे कापून घ्या.
स्टेप १

पनीरचे तुकडे करून राहिलेले पनीर क्रंबल करून त्यामध्ये काजू,बदाम,पिस्ता आणि बेदाणे मिक्स करून घ्या वरून थोडी कोथिंबीर,आले लसून पेस्ट आणि चवीनुसार मीठ घाला.पनीर मधोमध कापून आपण केलेले स्टफीन त्यामध्ये भरा.त्यानंतर मैद्याचे बेटर बनवून घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला.
स्टेप ३

एका कढईत तेल घेऊन पनीरचे स्टफीन भरलेले तुकडे मैद्याच्या बेटर मध्ये डीप करा आणि तळून घ्या.
स्टेप 4

टोमॅटोची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या पेस्ट करताना त्यामध्ये दोन मिरच्या घाला.
स्टेप 5

कढई मध्ये टेल गरम करून त्यामध्ये जिरे,कसुरी मेथी,हिंग,धने पावडर,हळद आणि आले टाकून मसाला परतून घ्या आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
स्टेप 6

मसाल्याला तेल सुटल्यानंतर क्रीम टाका आणि व्यवस्थित मिक्स करून एक उकळी येऊ द्या. उकळी येईपर्यंत मिश्रण हलवत रहा आणि वरून गरम मसाला , कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला आणि थोडा वेळ झाकून ठेवा.
स्टेप 7

उकळी आलेल्या मिश्रणामध्ये तळलेले पनीरचे सँडविच टाका. Gas बंद करून दोन मिनिटे परत एकदा झाकून ठेवा.
स्टेप 8

आपली पनीर पसंदा रेसिपी तयार आहे.सर्व्ह करून हिरव्या कोथिंबीर आणि क्रीमने सजवा आणि भात किंवा नान बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
पनीर पसंदा रेसिपी बद्दल काही मनोरंजक गोष्टी
Paneer Pasanda हि प्रसिद्ध मुघलाई डिश, चिकन पसंदाची शाकाहारी आवृत्ती आहे.
“पसंदा” हा शब्द उर्दू भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ “आवडणारा” किंवा “प्रत्येकाला आवडलेला” असा होतो.
डिशमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात, कारण ते पनीरसह तयार केले जाते, पनीर पसंदा रेसिपी हा भारतीय रेस्टॉरंट्समध्ये, विशेषतः देशाच्या उत्तरेकडील भागात एक लोकप्रिय पदार्थ आहे.
वेगवेगळ्या भागानुसार या डिशची चव बदलली जाते.
Conclusion
शेवटी, Paneer Pasanda हा एकचविष्ट पदार्थ आहे जो तयार करणे खूप सोपे आहे आणि विशेष प्रसंगी पनीर पसंदा तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. जी सर्वांना आवडेल. आम्हाला आशा आहे की या लेखामध्ये तुम्हाला पनीर पसंदा रेसिपी बद्दल हवी ती माहिती मिळाली असेल.
FAQs
पनीर पसंदा एक मसालेदार पदार्थ आहे का?
पनीर पसंदा हा एक हलका मसालेदार पदार्थ आहे, कारण चवीनुसार मसाले वापरले जाऊ शकतात.
मी कृतीसाठी ताजे टोमॅटोऐवजी कॅन केलेला टोमॅटो वापरू शकतो का?
होय, कॅन केलेला टोमॅटो ताज्या टोमॅटोचा पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो, परंतु डिशची चव थोडीशी बदलू शकते
पनीर पसंदा तयार करण्यासाठी किती वेळ लागतो?
पनीर पसंदा तयार करण्याची वेळ अंदाजे 30-40 मिनिटे आहे.
मी पनीर पसंदा अगोदर तयार करून नंतर पुन्हा गरम करू शकतो का?
होय, डिश अगोदर तयार केली जाऊ शकते आणि रेफ्रिजरेटरमध्ये 2-3 दिवसांपर्यंत ठेवली जाऊ शकते. सर्व्ह करण्यापूर्वी ते मंद आचेवर पुन्हा गरम करता येते.
मी डिशमध्ये भाज्या जोडू शकतो का?
होय, सिमला मिरची, मटार आणि गाजर यांसारख्या भाज्या अधिक पौष्टिक आणि चवदार बनवण्यासाठी डिशमध्ये जोडल्या जाऊ शकतात.
Pav Bhaji Recipe : एक स्वादिष्ट स्ट्रीट फूड Delight
Pandhra Rassa Best Recipe in Marathi कोल्हापुरी पांढरा रस्सा रेसिपी
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.