RRB Group D Bharti 2025 : रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) ग्रुप डी पदांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. CEN No. 08/2024 अंतर्गत एकूण 32,438 पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 पासून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
RRB Group D Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा:
- अधिसूचना जाहीर तारीख: 22 जानेवारी 2025
- ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 23 जानेवारी 2025
- अर्जाची अंतिम तारीख: 22 फेब्रुवारी 2025
- अर्जामध्ये दुरुस्तीसाठी विंडो: 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025
रिक्त पदांचा तपशील:
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
पॉईंट्समन-B | 5,058 |
असिस्टंट (ट्रॅक मशीन) | 799 |
असिस्टंट (ब्रिज) | 301 |
ट्रॅक मेंटेनर ग्रेड-IV | 13,187 |
असिस्टंट P-Way | 247 |
असिस्टंट (C&W) | 2,587 |
असिस्टंट TRD | 1,381 |
असिस्टंट (S&T) | 2,012 |
असिस्टंट लोको शेड (डिझेल) | 420 |
असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) | 950 |
हे हि वाचा – Railway Jobs 2025 : दक्षिण मध्य रेल्वेत 4232 ट्रेड अप्रेन्टिस पदांसाठी भरतीची मोठी संधी
वयोमर्यादा:
18 ते 36 वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- ITI/अप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवी ही पात्रता म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही.
निवड प्रक्रिया:
- संगणकीय परीक्षा (CBT)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
संगणकीय परीक्षेचा पॅटर्न:
- सामान्य विज्ञान: 25 प्रश्न (25 गुण)
- गणित: 25 प्रश्न (25 गुण)
- सामान्य बुद्धिमत्ता व तर्क: 30 प्रश्न (30 गुण)
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी: 30 प्रश्न (30 गुण)
- नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
वेतन:
- मूल वेतन: ₹18,000 (7वा वेतन आयोग)
- इतर भत्ते: DA, HRA, TA इत्यादी.
- प्रोत्साहन: प्रवास आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ.
अर्ज प्रक्रिया:
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: rrbcdg.gov.in
- नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा (जन्मतारीख, आधार क्रमांक, मोबाईल नंबर इ.).
- ईमेल व मोबाईल नंबर OTP द्वारे सत्यापित करा.
- अर्जात फॉर्म I व II पूर्ण करा.
- ऑनलाईन शुल्क भरणा करा.
- आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले प्रतिमा अपलोड करा.
अर्ज शुल्क:
- SC/ST/महिला/दिव्यांग: ₹250 (CBT मध्ये हजर झाल्यानंतर परत मिळणार).
- इतर: ₹500 (CBT नंतर ₹400 परत मिळतील).
संपर्क:
ईमेल: rrb.help@csc.gov.in
फोन: 0172-565-3333 / 9592001188
महत्त्वाची टीप:
अर्ज फक्त एकाच रेल्वेसाठी करावा. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अपात्र ठरवले जाईल.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.