RRB Recruitment 2025 : रेल्वे भरती मंडळाने (RRB) नोकरी इच्छुकांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेकडून गट-D भरतीसाठी 32,438 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 पासून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीबाबत सविस्तर माहिती लवकरच RRB च्या अधिकृत वेबसाईट्सवर उपलब्ध होईल.
भारतीय रेल्वे भरती 2025: पदसंख्या
या भरती मोहिमेत विविध विभागांमध्ये पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ट्रॅफिक, अभियांत्रिकी, मेकॅनिकल, S&T, आणि इलेक्ट्रिकल विभागांचा समावेश आहे.
- ट्रॅफिक विभाग: पॉइंट्समन-B साठी 5,058 पदे
- अभियांत्रिकी विभाग: ट्रॅक मशीन सहाय्यकासाठी 799 पदे आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV साठी 13,187 पदे
- मेकॅनिकल विभाग: असिस्टंट (ब्रिज) साठी 301 पदे, असिस्टंट (C&W) साठी 2,587 पदे, असिस्टंट (लोको शेड-डिझेल) साठी 420 पदे, आणि असिस्टंट (वर्कशॉप) साठी 3,077 पदे
- इलेक्ट्रिकल विभाग: असिस्टंट TRD साठी 1,381 पदे आणि असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) साठी 950 पदे
एकूण 32,438 पदांची भरती करण्यात येणार आहे.
हे हि वाचा – Mahagenco 2024 : माहिती आणि अर्ज प्रक्रिया
पात्रता:
- उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण केलेली असावी किंवा NCVT कडून नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) प्राप्त केलेला असावा.
- उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावे. विविध प्रवर्गांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज फी:
- सामान्य आणि OBC उमेदवार: ₹500 (CBT परीक्षेला हजर राहिल्यास ₹400 परत केले जातील)
- SC, ST, EBC, महिला, आणि ट्रान्सजेंडर उमेदवार: ₹250 (परीक्षेला हजर राहिल्यास संपूर्ण रक्कम परत केली जाईल)
RRB 2025 Exam Pattern परीक्षा पद्धती:
गट-D भरती प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पार पडेल:
- कंप्युटर आधारित चाचणी (CBT-1)
- शारीरिक क्षमता चाचणी (PET)
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
CBT साठी प्रश्न विभाजन:
- सामान्य विज्ञान: 25 प्रश्न
- गणित: 25 प्रश्न
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र: 30 प्रश्न
- सामान्य जागरूकता: 20 प्रश्न
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील, तर योग्य उत्तरासाठी 1 गुण मिळेल.
RRB Recruitment 2025 Important Dates महत्त्वाच्या तारखा:
- अधिसूचना प्रसिद्धीची तारीख: 28 डिसेंबर 2024
- अर्ज भरण्यास सुरुवात: 23 जानेवारी 2025
- अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी RRB च्या अधिकृत वेबसाईट्सला भेट द्यावी.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.