Latest News

Shivrajyabhishek Sohala : यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा पहिल्यांदाच कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर साजरा होणार.

Shivrajyabhishek Sohala Kolhapur Image : Google

महाराष्ट्र शासनाने नियोजित केलेला Shivrajyabhishek Sohala छत्रपती संभाजीराजे रायगडावर साजरा करणार आहेत. रायगडावर याची जय्यत तयारी सुद्धा झाली आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर येथे शाहू महाराज,मालोजीराजे यांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची सर्व तयारी झाली असून श्रीमंत शाहू महाराज यांनी पहाणी केली आहे.नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.६ जूनला सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्यास प्रारंभ होईल.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक होणार असून मोठ्या संख्येने या दिमाखदार सोहळ्यास शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे राज्यसरकाराने यंदाचा Shivrajyabhishek Sohala ३५० वा म्हणून साजरा केला असताना शाहू महाराज छत्रपती यांनी मात्र यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा हा ३४९ वा असल्याचे सांगितले आहे. दरवर्षी जुन्या राजवाड्यात साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा पहिल्यांदाच नवीन राजवाड्यात साजरा होत असल्यामुळे तो छत्रपती घराण्यासाठी आणि शिवभक्तांसाठी खास आहे.

यंदाचा ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा नवीन राजवाड्याच्या प्रांगणात सकाळी साडे सात ते दहा या वेळेत साजरा होईल .यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सौ याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच निमंत्रित मंडळी आणि शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.

Shivrajyabhishek Sohala रूपरेषा

  • सकाळी साडे सात वाजता सनई चौघडा वादन
  • आठ वाजता झांज पथकाचा कार्यक्रम
  • साडे आठ वाजता बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री बँड, यांचे वादन
  • नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक
  • सव्वा नऊ वाजता पोवाड्याचा कार्यक्रम
  • साडेनऊ वाजता शौर्य गीते सादर होतील
  • पावणे दहा वाजता मराठा स्फूर्ती गीत सादर होतील
  • 9 वाजून 50 मिनिटांनी मर्दानी खेळ सादर होतील

संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार

याचवेळेस संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.

Read more: Shivrajyabhishek Sohala : यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा पहिल्यांदाच कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर साजरा होणार.

Shivrajyabhishek Sohala live : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहा LIVE