Tendlya : तेंडल्या प्रेक्षकांना १९९० च्या दशकात नेऊन ठेवणारी गोष्ट

क्रिकेट म्हणजे प्रत्येक भारतीय क्रिकेट वेड्यांसाठी जीव कि प्राण आहे.आणि तुम्ही १९९० च्या दशकात मोठे झाला असाल तर नक्कीच तुमच्या हृदयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सचिन तेंडूलकर नक्कीच बसला असणार.त्या काळी सचिन म्हणजे प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटायचा. याच सचिन तेंडूलकरच्या व्यक्तिमत्वाला मध्यवर्ती ठेऊन Tendlya हि कथा गुंफली आहे.

Tendlya : तेंडल्या प्रेक्षकांना १९९० च्या दशकात नेऊन ठेवणारी गोष्ट 1

Tendlya तेंडल्या

क्रिकेट जर धर्म असेल तर सचिन तेंडुलकर देव होता. तो असा काळ होता जेव्हा टीम इंडिया क्रिकेट मॅच खेळायची तेव्हा प्रत्येकजण टिव्हीत तोंड घालून बसलेला असायचा. आणि त्यावेळी टिव्ही सुद्धा ठराविक लोकांच्याच घरी असायचे. ज्यांच्या घरी टीव्ही नसायची ते कुठे ना कुठे हातापाया पडून टिव्ही पहायचे. हा अनुभव काही वेगळाच होता.जो आत्ताच्या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही.

मान्यवरांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया

सलील कुलकर्णी यांची तेंडल्या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया…

पण पश्चिम महाराष्ट्रातील एका खेडेगावात घडणाऱ्या तेंडल्या या चित्रपटाच्या माध्यमातून हा अनुभव नक्की घेता येईल. Tendlyaचित्रपटाची कथा आपल्याला सरळ १९९० च्या दशकात घेऊन जाते. गावातील दोन तरुण-गज्या (फिरोज शेख) जो वडाप चालक म्हणून काम करतो.आणि शाळेत जाणारा मुलगा Tendlya (अमन कांबळे) गावातील सामाजिक-राजकीय घडामोडींमध्ये, या चित्रपटात या दोन मुलांचा प्रवास, सचिन तेंडुलकरचे दोन्ही कट्टर चाहते आहेत. गज्याची धडपड रंगीत टीव्ही घरी आणण्यासाठी आहे जेणेकरून त्याला क्रिकेट सामना पाहण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही, तर Tendlya चा उद्देश स्थानिक क्रिकेट सामना जिंकणे आहे. मग नेमके काय घडते ? या दोघांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ? या गोष्टींभोवती तेंडल्या या चित्रपटाची कथा फिरते.

सचिन तेंडूलकर यांची Tendlya चित्रपटाविषयी प्रतिक्रिया…

 

सचिन तेंडुलकरने लोकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासोबतच तरून पिढीला एक उर्जा सुद्धा दिली. तेंडल्या ही अशाच स्वप्नांची आणि ती साध्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची कथा आहे. कथा अगदी सोपी आहे आणि ती सरळधोट पणे उलगडत जाते. दिग्दर्शकाने कथेला पूर्णपणे मेलोड्रामॅटिक बनविण्याचा आजीबात प्रयत्न केलेला नाही, किंवा जोर जबरदस्तीने कोणताही सामाजिक संदेश प्रेक्षकांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेंडल्या ही दोन मुलांची साधी गोष्ट आहे जी सचिन तेंडुलकरपासून प्रेरित आहेत आणि त्यांना आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत.

दिग्दर्शक : सचिन जाधव, नचिकेत वाईकर यांनी विषय खूप चांगल्या प्रकारे हाताळला असून वास्तवतेचा एक आभास निर्माण होतो आणि प्रेक्षक थेट ९० च्या दशकात जाऊन बसतो. हा चित्रपट १९९० च्या पिढीला त्यांच्या भूतकाळात नेऊन ठेवतो.हा चित्रपट नक्की चित्रपटग्रहात जाऊन पहावा.

सिनेमाचे नाव : तेंडल्या Tendlya
प्रस्तुती          : सुनंदन लेले
निर्माते          : सचिन जाधव, चैतन्य काळे
सहनिर्माते     : टुलिप एंटरटेन्मेंट
कथा, संवाद  : सचिन जाधव
पटकथा        : सचिन-नचिकेत
दिग्दर्शक      : सचिन जाधव, नचिकेत वाईकर
संगीत          : नीलेश निर्मला, सारंग कुलकर्णी
कलाकार      : फिरोज शेख, अमन कांबळे, ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, अंकिता यादव

Tendlya Movie Review: स्वप्नपूर्तीची ‘भिडणारी’ गोष्ट

नवनवीन वेब् स्टोरीज पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a comment