The Kerala Story : केरला स्टोरीचे आतापर्यंतचे Box Office collection

The Kerala Story

The Kerala Story

The Kerala Story हा चित्रपट 5 मे ला प्रदर्शित झाला आणि त्याने जगभरातील लोकाना विचार करायला भाग पाडले. आज 22 दिवस झाले The Kerala Story अजूनही Box Office वर कमाई करताना दिसतोय.

पण आज 22 व्या दिवशी Box Office वर घसरण दिसून आली कारण तिने 2.50 कोटी कमावले जे पहिल्या दिवसापासून चित्रपटासाठी सर्वात कमी आहे आणि ट्रेड पोर्टल नुसार गुरुवारच्या 3.10 कोटींच्या कलेक्शनमध्ये थोडी घसरण झाली आहे.


Adah Sharm च्या The Kerala Story ने चित्रपटगृहात 21 व्या दिवशी अखेर जगभरात बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला पार केला होता. वादाच्या भोवऱ्यात सापडून हि हा चित्रपट 200 कोटीच्या वर गेला आहे.

चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 216.07 कोटी रुपये आहे. हा चित्रपट आता तिसर्‍या वीकेंडवर आला असून प्रेक्षकांच्या संख्येत घट होत आहे.

The Kerala Story कथा केरळमधील एका हिंदू महिलेच्या कथेभोवती फिरते, ज्याची मुख्य भूमिका अभिनेत्री अदा शर्माने केली आहे. चित्रपटात, शर्माच्या पात्राचे ब्रेनवॉश करून इस्लामचा स्वीकार केला जातो आणि तिला सीरियाला पाठवले जाते, जिथे तिला ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते आणि तिच्या प्रवासात तिचा छळ केला जातो.

“केरळमधील 32,000 महिलांच्या हृदयद्रावक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथा…” या चित्रपटाच्या वन लाईन मुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी आज 22 दिवस झाले.तो बॉक्सऑफिसवर कमाई करत आहे. विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती असूनदिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून केरळ स्टोरी वादात सापडली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाला सार्वजनिक पाहण्यासाठी प्रमाणित केले. तथापि, निर्मात्यांना हा चित्रपट काल्पनिक आहे आणि वास्तविक घटनांनी प्रेरित नाही असे अस्वीकरण जोडण्यास सांगितले.

Satyajit Ray – Master फिल्ममेकर

The Kerala Story: Why an Indian film on Islamic State is so controversial

Leave a comment