९० च्या दशकात खेळले जायचे खेळ जे आजच्या पिढीला कदाचित माहिती देखील नसतील त्यांना नक्की माहिती करून द्या..

Image : Pintrest

 लहानपणीचे खेळ 

तुम्ही सुद्धा अशी सायकल किंवा टू व्हिलरची टायर मोकाट  फिरवली असेल. कोणाचीतरी मागून आणून किवा चोरून 

Image : Pintrest

टायर फिरविणे 

संक्रातीला पतंग उडवणे म्हणजे पर्वणीच असायची.नाही दुकानातले  पतंग मिळाले तर वर्तमानपत्राचे पतंग घरी बनवून उडवायचे. 

Image : Pintrest

पतंग 

शाळेतून घरी न जाता शेतात राबणाऱ्या आई वडिलांसाठी शाळेतून शेतात पळायचे.मग असे लाड व्हायच्या त्याला तुलना नाही.

Image : Pintrest

लाड 

मोठ्या दादाला घोडा करून त्याच्या पाठीवर बसायचे आणि चल रे घोड्या राजकुमारीला घेऊन असे म्हणायचे हे प्रत्येकाने अनुभवले असेल.

Image : Pintrest

घोडा 

मुलींचा सर्वात आवडता खेळ दोरी उड्या कारण याला कोणी लागत नसे आपण आणि एक दोरी असली कि झाला खेळ सुरु...

Image : Pintrest

दोरी उड्या 

भोवरा हातावर घ्यायला पण कसब लागायचे भोवऱ्याचा डाव रंगला कि रंगला मग कोण कोणाला हरवतोय यात आख्खा दिवस कधी निघून जायचा ते समजायचं नाही..

Image : Pintrest

भोवरा 

सायकल शिकताना कितीदा गुडघे फोडून घ्यायचो आपण,कोणाचीतरी मागून नाहीतर त्याच्या परस्पर आणलेली सायकल त्यावेळी विमानापेक्षा मौल्यवान वाटायची.

Image : Pintrest

सायकल 

जो दुसऱ्यांना इज्जत देतो तोच खरा इज्जतदार असतो.कारण माणूस तेच दुसऱ्याला देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे.

Image : Pintrest

चाणक्यनीती