आनंद दिघे ज्यांना ठाण्यात शिवसेनेचा मजबूत पाया निर्माण करण्याचे श्रेय जाते. त्यांची आक्रमक राजकारणाची शैली अशी त्यांची ओळख होती.
Image : Pinterest
आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी, १९५१ साली झाला. आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले.
Image : Pinterest
शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघे साहेबांनी कार्यालयातच राहायला सुरुवात केली. त्यांची धर्मावरही खुप श्रद्धा होती,
Image : Pinterest
त्यांनीच सर्वप्रथम टेंभी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली , त्यांच्या या धर्म निष्ठेमुळे ते 'धर्मवीर' म्हणूनही लोकांमध्ये लोकप्रिय होते.
Image : Pinterest
शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये आनंद दिघेंवर टाडा लावण्यात आला होता आणि त्यांना अटकही करण्यात आले होते
Image : Pinterest
आनंद दिघेंच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ठाण्याचे बाळसाहेब ठाकरे, असंही म्हटलं जायचं.
Image : Pinterest
आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी स्वतःच आयुष्य अर्पण केलं होतं, यासाठी त्यांनी कुटुंबियांनाही लांब केलं.
Image : Pinterest
दिघे साहेबांचा २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. २६ ऑगस्टला रात्री १०ः३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Image : Pinterest
"भारताचे लोहपुरुष" सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्याच्या लढ्या दरम्यानचा संघर्ष आणि नेतृत्व ते राष्ट्राला एकत्र आणण्याच्या त्यांच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास...
Image : Pinterest