बोक्या सातबंडे सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी अनोखा अनुभव देणार नाटक

ज्येष्ठ अभिनेते प्रभावळकरांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तकावर आधारलेलं 'बोक्या सातबंडे'  रंगभूमीवर 

अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या बोक्या सातबंडे  याच  नाट्य रुपांतर डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. 

या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.

नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेट ची संकल्पना आणि उभारणी केलेली आहे.

आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये आहे. त्याच्या जोडीला यश शिंदे, सायली रामदास रामेश्वरी, ओंकार यादव, स्वाती काळे, सौरभ भिसे, शीवांश दीप्ती प्रणव जोशी आदि कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरतात.

प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची आहे._

 पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतोय.

सुट्टीमध्ये आपल्या आईबाबांच्या सोबत हा थरार मुलांनी अनुभवायलाच पाहिजे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा