सुधीर कुमार चौधरी यांचा जन्म १९८३ मध्ये  मुझफ्फरपूर, बिहार, येथे झाला.

Image : Google 

वयाच्या ६ व्या वर्षी त्याला भारतीय क्रिकेटचे वेड लागले आणि सचिन तेंडुलकरचा चाहता झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने माध्यमिक शाळेत असतानाच आपले शिक्षण सोडले. 

Image : Google 

त्याने एकदा भारतीय क्रिकेट संघाद्वारे खेळलेले सर्व क्रिकेट सामने पाहण्याची खात्री न मिळाल्यास आत्मदहनाची धमकी दिली होती.

Image : Google 

2003 पासून, सुधीर चौधरी यांची आवड भारताकडून खेळले जाणारे क्रिकेट सामने पाहणे होती. एप्रिल 2010 पर्यंत, त्याने अंदाजे 150 सामन्यांना हजेरी लावली होती,

Image : Google 

त्याचे संपूर्ण शरीर भारतीय झेंड्याच्या तिरंग्या रंगात रंगविलेले आणि  त्याच्या हातात भारताचा झेंडा असायचा तसेच अंगावर ठळक अक्षरात १० हा आकडा व तेंडुलकर असे रोमन लिपीत लिहीलेले असायचे.

Image : Google 

सुधीर चौधरी एका सामन्याच्या आदल्या दिवशी त्याच्या शरीरावर रंग लावायचा  आणि त्याच्या शरीरावर पेंट टिकवून ठेवण्यासाठी त्या रात्रीची तो  झोपत नसे.

Image : Google 

28 ऑक्‍टोबर 2003 रोजी सचिनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताकडून खेळताना पाहण्‍यासाठी मुझफ्फरपूर, बिहार ते मुंबई असा 21 दिवस सायकल चालवत तो मुंबईला गेला.

Image : Google 

असा चाहता होणे नाही ज्याने आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेट आणि sachin तेंडूलकर साठी समर्पित केले.

Image : Google 

 ज्या दिवशी भारताने वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विश्वविजेता बनला. खुद्द सचिन तेंडुलकरने  सुधीरला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये येऊन संघाच्या उत्सवात सहभागी होण्यास सांगितले.तेंडुलकरने सुधीर कुमारशी हस्तांदोलन केले, मिठी मारली आणि शेवटी झहीरच्या हातातून कप उचलू दिला. 

Image : Google