हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये WhatsApp आहे. रोज लाखो लोक Whatsapp Message वरून एकमेकांच्या संपर्कात आहेत.सकाळी सकाळी मोबाईल उघडून Whatsapp Message पाहिल्याशिवाय काही लोकांची सकाळ सुद्धा होत नाही. अशात एखादा टायपिंग मिस्टेक झालेला मेसेज सेंड झाला तर काय करायचे? हेच आपण आजच्या या लेखात सविस्तर पाहणार आहोत.
टायपिंग मिस्टेक
टायपिंग मिस्टेक हि एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या बाबतीत होते. गडबडीच्या वेळेत आपल्याला आलेल्या मेसेजना रिप्लाय देणे भाग असते पण गडबडीच्या वेळेत अनावधानाने आपल्या कडून काहीतरी चुकीचे टाईप होते आणि आपण खात्री न करताच ते सेंड करतो.पण आपली चूक लक्षात येईपर्यंत तो मेसेज सेंड झालेला असतो आणि online असणाऱ्या कित्येकांनी तो वाचलेला सुद्धा असतो.जो पर्यंत आपण तो डिलीट करत नाही.
गैरसमज
चुकीचा Whatsapp Message सेंड झाल्याने अपमान किंवा गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. मराठी भाषेचा विचार करता शब्दांची अदलाबदल झाली कि वाक्याचे अर्थ बदलतात.आणि असे मेसेज आपल्याला दिलीत करून नंतर टाईप करून सेंड करावे लागतात.यात आपला वेळ सुद्धा खर्ची घालावा लागतो. हा विचार करून Whatsapp ने आपल्या नवीन आवृत्तीमध्ये अशा चुकीच्या सेंड झालेल्या मेसेजसाठी एक नवीन फिचर add. केले आहे.
हे हि वाचा – Jio Bharat 4G फोन फक्त ९९९ – काय आहे विशेष या फोनमध्ये?
काय आहे नवीन फिचर?
चुकीचे संदेश सेंड झाले तर आपल्याला WhatsApp च्या जुन्या आवृत्ती मध्ये तो मेसेज डिलीट करून टाकण्याशिवाय पर्याय उपलब्ध न्हवता.पण आता WhatsApp ने आपल्या नवीन आवृत्ती मध्ये हा मेसेज ठराविक काळात एडीट करून अपडेट करता येईल असे फिचर add.केले आहे.त्यामुळे वापरकर्त्याना आता चुकीचा सेंड झालेला मेसेज दिलीत न करता एडीट करून अपडेट करता येईल.
Whatsapp Message कसा एडीट करायचा?
WhatsApp वापरकर्त्याना पहिले आपले WhatsApp अपडेट करून घ्यावे लागेल त्याशिवाय हा पर्याय आपल्या aap मध्ये उपलब्ध होणार नाही.
चुकीचा मेसेज सेंट झाला.डिलीट करू नका. त्यानंतर चॅटवर नेव्हिगेट करा.आणि मेसेज निळा होईपर्यंत दाबून धरा.
त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा.त्यानंतर एडीट वर क्लिक करा.
त्यानंतर आपला मेसेज एडीट करून घ्या आणि बाजूला दिसणाऱ्या बरोबर या चिन्हावर क्लिक करा.
तुमचा मेसेज एडीट होऊन सेंड होईल.
आपण काय लक्षात ठेवावे?
लक्षात ठेवा की मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचा संदेश केवळ 15 मिनिटांच्या कालावधीत एडीट करण्याची परवानगी देईल. त्यानंतर, आपण चुकून काहीतरी चुकीचे टाइप केल्यास, संदेश पुसून टाकण्याशिवाय त्याचे निराकरण करण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही.
FAQ
माझ्या whatsapp मध्ये एडीट ऑप्शन येत नाही ?
यासाठी तुम्हाला तुमचे whatsapp अपडेट करावे लागेल.
whatsapp वरती चुकीचा मेसेज गेल्यास काय होईल?
Whatsapp Message चुकीचा मेसेज गेल्यास अपमान किंवा गैरसमज होण्याची दाट शक्यता असते.
माझा चुकीचा मेसेज मी कसा एडीट करू शकतो?
चॅटवर नेव्हिगेट वर दीर्घकाळ दाबून तुम्ही एडीट ऑप्शन मध्ये जाऊन तुमचा मेसेज एडीट करून अपडेट करू शकता.
Best मोबाईल नंबर पाहिजे तो हि तुमच्या आवडीचा लगेच हे काम करा.
Amiba : Beware मेंदू खाणाऱ्या अमिबाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.