You Tube वरती Channel ओपन करून रोज हजारो नवीन निर्माते पैसे कमविण्याची संधी निर्माण करत असतात. पण त्यातील मोजकेच निर्माते पात्र ठरत होते आणि इतरांच्या नशिबी मात्र निराश्याच येते. याला कारण म्हणजे You Tube ने घातलेली अट.
You Tube आपल्या नियमांमध्ये वारंवार बदल करत असते. पहिले You Tube ला कोणीही आपले Channel ओपन करून monetize करू शकत होता. त्यानंतर You Tube ने घातलेली अट नवीन निर्मात्याला खूपच त्रासदायक ठरली ती म्हणजे कमीत कमी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास watch time आणि short व्हिडीओसाठी 10 लाख व्ह्यूज यामुळे जे मेहनतीने काम करत होते. ते त्यांचे प्रेक्षक वाढविण्यात अपयशी ठरल्यामुळे हि संधी गमावून लागले.
पण आता अशा नवीन निर्मात्यांची अडचण लक्षात घेऊन YouTube ने हि अट थोड्या प्रमाणात शिथिल करून नव्या निर्मात्यांना दिलासा दिला आहे.
काय आहे You Tube चा नवीन नियम
लहान निर्मात्यांना आता YouTube वर त्यांच्या Channel च्या माध्यमातून कमाई करण्याच्या अधिक संधी असतील. तरीही त्यांना त्यांचे सबस्क्रायबर वाढवणे आणि जाहिरात महसूल मिळविण्यासाठी विशिष्ट watch time पूर्ण करणे आवश्यक आहे.
थोडक्यात प्लॅटफॉर्मवर लहान निर्मात्यांना अधिक संधी देण्यासाठी YouTube ने कमाई धोरणांमध्ये मोठे बदल करत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ती YouTube भागीदार कार्यक्रमासाठी पात्रता आवश्यकता कमी करत आहे.
पूर्वी 1000 सदस्य असलेले लोक पात्र होते आता ही संख्या 500 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
- YouTube आता 500 सदस्य असलेल्या कोणालाही पैसे कमविण्याची परवानगी देईल.
- तसेच watch time 4,000 तासावरून 3,000 तास करण्यात आला आहे.
- शॉर्ट्स व्ह्यूजसाठी 10 million वरून 3 million करण्यात आली आहे.
पूर्वी, निर्मात्यांना YouTube भागीदार कार्यक्रमात सामील होण्यासाठी आणि त्यांच्या व्हिडीओवरती कमाई करण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागायचे. आता नवीन धोरणांनुसार, निर्मात्यांना पात्र होण्यासाठी केवळ 500 सदस्य असणे आवश्यक आहे, जे आधीच्या आवश्यकतेपेक्षा निम्मे आहेत .
त्यासोबतच watch time चा निकष 4,000 तासावरून 3,000 तास करण्यात आला आहे आणि शॉर्ट्स व्ह्यूजची आवश्यकता 10 million वरून 3 million करण्यात आली आहे. सुरुवातीला हे नियम युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू होतील.
लहान निर्मात्यांना आता YouTube वर त्यांच्या व्हिडीओवरती कमाई करण्याच्या अधिक संधी असतील, तरीही त्यांना त्यांचे प्रेक्षक वाढवणे आणि जाहिरात महसूल मिळविण्यासाठी विशिष्ट watch time पूर्ण करणे आवश्यक आहे. जे निर्माते आधीच YouTube भागीदार कार्यक्रमासाठी पात्र आहेत त्यांनी उच्च मर्यादा पूर्ण केल्यावर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. हे नियम भारतात लवकरच लागू होतील अशी आशा करू…
Read more: Good News You Tube 500 सब्स्क्रायबरला देणारYouTube announces new partner program
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.