नवीन विहीर अनुदान योजना २०२३

नवीन विहीर अनुदान योजना २०२३
नवीन विहीर अनुदान योजना २०२३ Image : Google

आज आपण या लेखात महाराष्ट्र कृषी विभागाच्या नवीन विहीर अनुदान योजना २०२३ बद्दल आतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जसे कि ही योजना नेमकी काय आहे ? ही योजना कोणासाठी आहे ? या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे ? योजनेला अर्ज कसा करायचा आहे ? अर्ज कोठे करायचा आहे ? अर्ज करताना आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? आणि या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ? चला तर मग जाणून घेऊ..

योजनेचा उद्देश काय आहे ?

नवीन विहीर अनुदान योजना २०२३ कृषी विभागाचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणे. प्रत्येक शेतकरी म्हणजे तो अल्पभूधारक शेतकरी आहे आणि पाण्याची सोय नाहीये त्याची पाण्याची सोय करून तो त्याचा आर्थिक स्थर आपल्याला उंचावायचा आहे आणि बारा माही शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणतं कोणतं पीक घेता यावं यासाठी तयार करायचा आहे

नवीन विहीर अनुदान योजना २०२३ तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे ?

या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे का ? याच्या अगोदर मागील योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्याला तीन लाख रुपयाचे अनुदान मिळत होते परंतु त्याच्यामध्ये आता एक लाख रुपयांची भर करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जर आता नवीन विहीर अनुदान योजना २०२३ मध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला प्रति चार लाख रुपयाच अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे.

नवीन विहीर अनुदान योजना २०२३
नवीन विहीर अनुदान योजना २०२३ Image : Google

कोण कोणती कागदपत्रे लागतील ?

नवीन विहीर अनुदान योजना २०२३ या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे कोण कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे

 • आधार कार्ड
 • शेत जमिनीचा सातबारा
 • आठ अ उतारा
 • बँकेचे पासबुक
 • एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
 • जातीचा दाखला
 • अर्जदार हा अपंग असेल तर अपंगाचे सर्टिफिकेट
 • पूर्वसंबंधी पत्र

पूर्वसंबंधी पत्र

पूर्वसंबंधी तुम्हाला कुठे मिळणार ? यासाठी तुम्हाला अर्ज एक योजना अनेक या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहेत.त्यानंतर एक अकाउंट तयार करायचआहे आणि या योजनेला अप्लाय करायचा आहे मग नंतर तिथून तुम्हाला पूर्वसंबंधी मिळेल.

नवीन विहीर अनुदान योजना 2023 अटी

आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन विहीर अनुदान योजना 2023 अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

 • शेतकऱ्याकडे शेती असण आवश्यक आहे.
 • शेती ही पीक घेणे योग्य असणं आवश्यक आहे.
 • शेतामध्ये अगोदरची कोणतीही विहीर असू नये.
 • अर्जदार व्यक्ती हा स्वतः शेतकरी असणं आवश्यक आहे.
 • ज्या शेतीसाठी त्याला विहीर घ्यायची आहे ते शेत त्या अर्जदाराच्या नावावर असणं आवश्यक आहे.
 • अर्जदार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
 • बँक अकाउंट त्याच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
 • बँक अकाउंट त्याच्या पॅन कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदारांनी यापूर्वी कोणतीही विहीर शेततळे किंवा सामूहिक शेततळे या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर म्हणजे कमीत कमी एक एकर तरी जमीन असणे आवश्यक आहे.
 • ज्या शेतामध्ये विहीर घ्यायची आहे त्या शेती पासून कमीत कमी500 मीटर वरती कोणतीही विहीर असू नये.
 • अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
 • विहिरीमध्ये अनेक भागीदार असतील तर त्या भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज कोठे करायचा ?

नवीन विहीर अनुदान योजना २०२३ साठी तुम्ही कोठेही अर्ज करू शकता. यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत.

तुम्ही स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

जिल्हापरिषदेत जाऊन अर्ज करू शकता.

ई सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल वरून देखील तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट : mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

Read more: नवीन विहीर अनुदान योजना २०२३

शेतकरी कर्ज माफी योजना सन 2023 तुमचे नाव यादीत आहे का ते पाहिले का ?

Dashing सुपरकॉप Amitabh Yash – 150 एन्काउंटर गुन्हेगारांचा कर्दनकाळ

Leave a comment

Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा .. Dry Fruits : कोणते ड्रायफ्रूट आपल्या शरीराला काय फायदा देते.. lara dutta : हा भारतीय टेनिसपटू आहे लारा दत्ताचा पती Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा..
Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा .. Dry Fruits : कोणते ड्रायफ्रूट आपल्या शरीराला काय फायदा देते.. lara dutta : हा भारतीय टेनिसपटू आहे लारा दत्ताचा पती Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा..