लाईव ऑन म्यूजिक प्रेजेंट “भाव फुलांचे” मनामनातले भाव सांगणारे गीत


लाईव ऑन म्यूजिक प्रेजेंट "भाव फुलांचे" मनामनातले भाव सांगणारे गीत

लाईव ऑन म्यूजिक प्रेजेंट भाव फुलांचे

मराठी संगीतात प्रेम गीतांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. प्रेमी युगुलांच्याच नव्हे तर जीवनातल्या सगळ्याच भावना या गीतांतून व्यक्त होत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये नेमके प्रेम गीते कमी दिसत असली तरी भावना या कालातीत आहेतच.

अशाच प्रकारे एक प्रेम गीत “भाव फुलांचे” सध्या गाजत आहे. या गीताच्या व्हिडीओ चे पोस्टर लॉंच नुकतेच मुंबईतील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात चैत्राली डोंगरे सह. कार्यवाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी विशाल पवार शाखा व्यवस्थापक, ऐश्वर्या बडाडे, मयुर भाटकर, गणेश तळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

लाईव ऑन म्यूजिक प्रेजेंट “भाव फुलांचे” या गीताचे प्रेजेंटर आहे श्वेता बसनाक (पाटील), निलेश पाटील तर निर्मिती श्री मिडिया आणि साई गोपाल प्रॉडक्शन यांनी संयुक्त पणे केली असून त्याचे निर्माते विजय बंगेरा व सौ. ज्योती भाटकर आहेत. या गीताचे बोल हे निलेश लोटणकर यांचे आहेत.

त्यांच्या सुरेख शब्दांवर स्वरसाज चढवलाय तो अमर देसाई यांनी. हे गीत अनिरुद्ध जोशी आणि लॅरिसा अल्मेडा यांनी गायलेले आहे. हे गीत ऐश्वर्या बडाडे आणि मयुर भाटकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. त्यासाठीचे दिग्दर्शन व नृत्यदिग्दर्शन हे नॉडी रसाल यांनी केले आहे.

गीताच्या व्हिडिओचे क्रिएटिव्ह डिरेक्टर रुपेश माने आहेत तर स्टाईल्स ज्योती केरकर-भाटकर यांनी केले आहे तसेच छायाचित्रकार व संकलन साधन भोईर यांनी केले आहे. हे गीत आणि त्याचा व्हिडीओ रसिकांना चांगलीच भुरळ घालत आहे व केवळ तरुणांनाच नाही तर सर्वचं वयोगटातल्या रसिकांच्या भावनांना स्पर्श करुन ते आपलसं वाटत आहे.

Read more: लाईव ऑन म्यूजिक प्रेजेंट “भाव फुलांचे” मनामनातले भाव सांगणारे गीत

Adipurush फायनल ट्रेलर रिलीज » 24yesnews.com

बाल शिवाजी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज

Leave a comment

Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस
Rishabh Pant : क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह तरी धमाकेदार पुनरागमन Golden Temple सुवर्णमंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ? Optical illusion images तुमची बुद्धी आणि दृष्टी तीक्ष्ण आहे का पहा.. Breaking Boundries: Unraveling Cricket T20 World Records AI generator : A I ने बनविलेल्या छोट्या बुद्धाच्या फनी इमेजस