रामशेज चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरु होणार
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटाचा एक नवा ट्रेंड चालू झाला आहे. खरं तर ऐतिहासिक चित्रपट बनविणे हि खर्चिक बाब असते.त्यामुळे निर्माते अशा चित्रपटात हात घालताना थोडे सावधान असत. पण गेल्या वर्षी आलेल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आणि निर्मात्यांना दाखवून दिले कि असे भव्य दिव्य मराठी चित्रपट सुद्धा प्रेक्षक कसे डोक्यावर घेतात.
हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे निम्मित्त साधून दिग्दर्शक रवी जाधव यांनी बाल शिवाजी या चित्रपटाची घोषणा केली असताना या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील आणखी एका चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा रामशेज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्लॉक बस्टर पावनखिंड या चित्रपटाचे निर्माते या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नाशिकजवळ असलेला रामशेज किल्ला साडेसहा वर्षं मराठ्यांनी मुघलांविरुद्ध लढवला होता. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येईल.
अशी आख्यायिका आहे कि प्रभू श्रीरामचंद्र लंकेला जात असताना काही काळासाठी त्यांचे वास्तव्य या किल्यावर होते म्हणून त्याचे नाव रामशेज पडले.
या आख्यायिके नुसार चित्रपटाच्या पोस्टरची थीम तशीच ठेवण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दाखवण्यात आली आहे.
बाल शिवाजी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.