रामायण : The legend of Prince Ram हा जपानी दिग्दर्शकाने बनवलेला चित्रपट तुम्ही पाहिलात का ? A Innovative Masterpiece

रामायण : The legend of Prince Ram
रामायण : The legend of Prince Ram Image : Google

रामायण : The legend of Prince Ram हा 1992 चा ऍनिमेटेड चित्रपट आहे. जो जपान आणि भारत यांनी सह-निर्मित केला आहे. युगो साको निर्मित आणि दिग्दर्शित हे भारतीय महाकाव्य Ramayan वर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोइची सासाकी आणि राम मोहन यांनी केले होते.

खरच जपान सारख्या दुसऱ्या देशातील एका दिग्दर्शकाने हा चित्रपट का बनवला आणि कसा बनवाला ज्याची तुलना आदिपुरुष या नुकत्याच येऊन गेलेल्या बिग बजेट चित्रपटाबरोबर केली तर कोण सरस ठरेल या बद्द्ल जाणून घेऊ आजच्या या लेखात.

कथा

अयोध्येचा राजा दशरथ त्यांची तिसरी पत्नी कैकेयीने राजकुमार रामाला 14 वर्षांसाठी वनवासास पाठविण्यास भाग पाडले, जिथे श्री राम, भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह प्रभू श्री राम अयोध्येतून निघून जातात आणि लंकेचा राक्षस राजा वनवासात असताना माता सीतेचे अपहरण करतो. राम आणि लक्ष्मण सीतेला वाचवण्यासाठी हनुमान आणि सुग्रीव याना घेऊन लंकेला निघतात. हि कथा आपल्याला माहीतच आहे.पण या कथेमुळे जपानचा युगो साको कसा प्रभावित झाला.

रामायण : The legend of Prince Ram
Ramayan : The legend of Prince Ram Image : Google

रामायण : The legend of Prince Ram


1983 मध्ये, “द रामायण अवशेष” वर काम करत असताना, उत्तर प्रदेश (भारत) मधील अलाहाबादजवळ डॉ. बी.बी. लाल यांनी केलेल्या उत्खननाविषयीच्या माहितीपटावर युगो साको काम करत असताना त्यांना Ramayan च्या कथेबद्दल माहिती मिळाली. त्यांना Ramayan ची कथा इतकी आवडली की त्यांनी या विषयावर सखोल संशोधन केले आणि जपानी भाषेत रामायणाच्या 10 आवृत्त्या वाचल्या.

Ramayan वाचल्यानंतर त्याला या कथेचे अॅनिमेशनमध्ये रुपांतर करावंसं वाटलं कारण त्याला असं वाटत होतं की थेट-अ‍ॅक्शन चित्रपट रामायणाचा खरा सार कॅप्चर करूच शकत नाही, “कारण राम हा देव आहे, तो म्हणाला मला त्याचं अॅनिमेशनमध्ये चित्रण करणं योग्य वाटलं.

स्टुडिओ

यासाठी निप्पॉन Ramayan फिल्म कंपनी या नवीन निर्मिती स्टुडिओची स्थापना करण्यात आली आणि चित्रपटाचे मुख्य अॅनिमेशन १९९० मध्ये ४५० कलाकारांसह सुरू झाले. भारतीय कलाकारांच्या मदतीने जसे कि धोतर कसे परिधान केले जाते. मुलांना त्यांच्या मोठ्यांकडून आशीर्वाद कसा मिळतो यासारख्या भारतीय चालीरीती आणि परंपरांसह चित्रण या चित्रपटात केले आहे.

मूळ इंग्रजी आवृत्ती (संस्कृतमध्ये गायली) आणि हिंदी डब आवृत्ती (हिंदीमध्ये गायली) प्रत्येक आवृत्तीसाठी वेगळी गाणी बनविण्यात आली. दोन्ही खाली सूचीबद्ध आहेत. जानेवारी 1993 मध्ये भारतातील 24व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथमच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.त्यानंतर हा चित्रपट 1993 च्या व्हँकुव्हर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवण्यात आला.

रामायण : The legend of Prince Ram
रामायण : The legend of Prince Ram Image : Google

प्रदर्शन

रामायण : The legend of Prince Ram

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी डब आवृत्ती प्रसिद्ध झाली. Ramayan मध्ये रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी या आवृत्तीत श्री रामाला आवाज दिला होता. जपान आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त या चित्रपटाचे वितरण करण्यात आले. रामजन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचल्यामुळे आणि हा चित्रपट वादात सापडल्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला नाही. पण नंतर तो टीव्ही चॅनेल कार्टून नेटवर्कवर प्रसिद्ध करण्यात आला. बाबरी मशीद दंगलीच्या वेळी भारतात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असली तरी नंतर तो हिंदीत डब करून डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आला.

निष्कर्ष

खूप साऱ्या नामांकित फिल्म फेस्टिवल मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.आज आदिपुरुष पाहिल्यानंतर या चित्रपटाविषयीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.आपली भारतीय संस्कृती याबद्दल काहीही कल्पना नसताना एक जपानी दिग्दर्शक Ramayan चा सखोल अभ्यास करून एक चित्रपट बनवतो आणि वाहवा मिळवतो.हे आपल्या आदिपुरुष च्या टीमला का नाही जमले.

Read more: रामायण : The legend of Prince Ram हा जपानी दिग्दर्शकाने बनवलेला चित्रपट तुम्ही पाहिलात का ? A Innovative Masterpiece

Ramayana: The Legend of Prince Rama (Full animated film 1993)

Get Ready for the Thrilling Sequel Squid Game 2 रिलीज होणार या महिन्यात

Leave a comment

एम टाऊनचा अविस्मरणीय अभिनेता देढ फुट्या भाई आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय !
एम टाऊनचा अविस्मरणीय अभिनेता देढ फुट्या भाई आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय !