अधिक मास म्हणजे काय?
हिंदू कॅलेंडर प्रमाणे अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आहे हा महिना तीन वर्षानंतर एकदा येतो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना किंवा धोंड्याचा मास किंवा मल महिना किंवा अधिक मास असे म्हणतात. प्रत्येक भागानुसार या महिन्याला वेगळे नाव आहे. हा महिना अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी खूप शुभ मानला जातो. अधिक मास यावर्षी श्रावण महिन्याला जोडून आलेला असल्यामुळे श्रावण हा यावर्षी दोन महिन्याचा असणार आहे.
धोंड्याचा महिना कधी आहे ?
अधिक महिना 18 जुलैपासून सुरू होऊन 16 ऑगस्ट पर्यंत आहे. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना मानला जातो. जावयाला याच महिन्यामध्ये धोंडे दान किंवा वाण का दिले जाते.अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. पुरुषोत्तम म्हणजे नारायण साक्षात भगवान विष्णू , मुलीचे जेव्हा लग्न होते तेव्हा आपल्या घरची लक्ष्मी आई बाप तिच्या पतीला सोपवतात म्हणजेच जावायाला नारायणाचे रूप मानले जाते.
हे हि वाचा – Jio Bharat V2 विक्रीस उपलब्ध जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
जावयाला काय मान द्यावा
धोंड्याच्या महिन्यांमध्ये जावयाला मानपान दिला जातो. तसेच धोंड्याच्या महिन्यातच तो का दिला जातो. तर शास्त्रानुसार शास्त्रानुसार जावयाला नारायणाचे स्वरूप मानले जाते आणि अधिक मास हा भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना आहे. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात आपली मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्यांचा मानपान केला जातो.
अधिक मासात जावयाला काय द्यावे ?
या महिन्यात दान करने सुद्धा खूप पुण्याचे मानले जाते.पण हे दान यथाशक्ती आणि गुप्त असावे असेसूचित केले आहे. शास्त्रानुसार जावयाला काय दान द्यावे तर अनारशाचे वाण किंवा दीपदान जावयाला द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. खरतर हे दान जावयाच्या स्वरूपात विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे. अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे घरामध्ये केले जातात असे धोंडे करून या महिन्यात आपल्या लेकीचा आणि जावयाचा मानपान केला जातो
33 च्या पटीत दान का करतात?
शास्त्रानुसार जावयाला 33 अनारसे 33 मैसूर पाक 33 बत्ताशी आणि दीपदान असे दान केले जाते. या महिन्यात जावयाला 33 वस्तूचंच दान का करावं? अधिक महिना हा 32 दिवस 16 महिने आणि आठ तासांचा असतो. म्हणजे सुमारे 33 दिवसांचा असतो म्हणून आवर्जून 33 वस्तूंचे दान केले जाते.
हे हि वाचा – भारताची Chandrayaan 3 मोहीम या दिवशी होणार प्रक्षेपित
अधिक महिन्यात जोडवी का बदलतात ?
धार्मिक कारण
अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी या मुळे.जोडवी म्हणजे काय? तर जोडवी म्हणजे जोडी. यात एक जण नसेल तर ती जोडी आपण अपूर्ण मानतो आणि ही जोडी टिकून राहावी म्हणून सुहासिनी महिला या महिन्यात आपली जोडवी बदलतात आणि नवीन जोडवी घेतात.हे झाल याच धार्मिक कारण.
शास्त्रीय कारण
नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय.जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात याला शास्त्रीय कारण आहे. अंगठ्या शेजारील बोटांमधली नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी हि ॲक्युपंक्चर चे काम करतात.
जोडवी चांदीचीच का घालतात?
जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात उर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात.
FAQ
अधिक मास म्हणजे काय?
तीन वर्षातून एकदा अतिरिक्त महिना येतो त्याला अधिक मास म्हणतात.
अधिक मासाला अजून कोणकोणती नावे आहेत?
अधिक मासाला धोंड्यांचा महिना, मल महिना, पुरुषोत्तम महिना असे प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
अधिक महिन्यात जावयाचा मानपान का करतात?
अधिक महिना हा विष्णूच्या भक्तीचा महिना आहे त्यामुळे जावयाला नारायणाचे स्वरूप मानून त्याचा मानपान केला जातो.
अधिक महिन्यात सुवासिनी जोडवी का बदलतात?
जोडवी म्हणजे जोड आणि हि जोड अखंड एकत्र रहावी ती कधी अपूर्ण होऊ नये म्हणून सुवासिनी या महिन्यात जोडवी बदलतात.
Uniform Civil Code Advantages Disadvantages : समान नागरी कायदा आहे तरी काय?
Dhirendra Shastri : बागेश्वर धाम वाले बाबा आहे तरी कोण?
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.