Walmik Karad Property : एकेकाळचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडने आज ज्या प्रकारे अफाट संपत्ती जमवली आहे, ती बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. बीडसारख्या जिल्ह्यात जिथे उसतोड कामगार पोटासाठी देशभर प्रवास करतात, तिथून येऊन कराडने इतकी संपत्ती कशी जमवली, हा खरा प्रश्न आहे.
Walmik Karad चा थोडक्यात परिचय
Walmik Karad हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावचे रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिक कराड यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी परळीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आर्थिक गरजा भागवण्यासाठी, ते परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवत असत आणि तिकीट विक्रीद्वारे काही उत्पन्न मिळवत असत.
या काळात, वाल्मिक कराड यांचा संपर्क गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी फुलचंद कराड यांच्याशी आला. फुलचंद कराड यांच्या माध्यमातून, वाल्मिक कराड यांना गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या भूमिकेत त्यांनी घरातील विविध कामे सांभाळली आणि हळूहळू गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला.
हे हि वाचा – मोक्का कायदा म्हणजे काय? काय आहे या कायद्याची पार्श्वभूमी
1995 साली वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळात, पोलिसांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी वाल्मिक कराड यांच्या पायाला लागली. या घटनेनंतर, गोपीनाथ मुंडे यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर, वाल्मिक कराड यांनी त्यांच्या पुतण्यांपैकी एक, धनंजय मुंडे यांच्यासोबत आपले संबंध अधिक दृढ केले. या काळात, वाल्मिक कराड यांचे परळीत प्रभाव वाढला आणि त्यांची दहशत निर्माण झाली.
अलीकडेच, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी Walmik Karad यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात त्यांच्यावर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिक कराड यांच्या जीवनप्रवासावर अधिक माहिती मिळवण्यासाठी, खालील व्हिडिओ पाहू शकता:
Walmik Karad Property चा आढावा:
- मगरपट्टा: ७५ कोटींचा फ्लोअर ड्रायव्हरच्या नावाने.
- पुणे FC रोड: प्रत्येकी ५ कोटींची ७ दुकाने.
- बीड: ३५ कोटींची ७ वाईन शॉप्स.
- बार्शी: दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर ५० एकर जमीन.
- सोलापूर: ४ सातबारे ज्योती जाधवच्या नावावर.
- जामखेड: ज्योती जाधवच्या नावावर १०-१५ एकर.
- माजलगाव: सुदाम नरवडेच्या नावावर ५० एकर.
- सिमरी पारगाव: मनिषा नरवडेच्या नावावर १०-१२ एकर.
- सिमरी पारगाव: योगेश काकडेच्या नावावर १५-२० एकर.
- सोनपेठ तालुका: २० एकर क्रशर.
- दिघोळ: ज्योती जाधवच्या नावावर १०-१५ एकर.
- पिंपरी चिंचवड: काळेवाडीत ३.२५ कोटींचा ४BHK फ्लॅट.
- वाकड (IT हब): १ कोटींचा २BHK फ्लॅट.
- पुणे: ज्योती जाधवच्या नावाने १५ कोटींची २ ऑफिसेस.
- हडपसर: एमनोरामध्ये ३ कोटींचे २ फ्लॅट.
- खराडी: ज्योती जाधवच्या नावाने २ कोटींचा एक फ्लॅट.
- व्यवसाय: धनंजय मुंडेंसोबत पार्टनरशिपमध्ये कंपनी आणि जागा.
Walmik Karad Property बाबत प्रश्न उभे करणारे मुद्दे:
- संपत्तीचा स्रोत:
- ना कोणती उद्योगधंद्याची पार्श्वभूमी,
- ना शेतीतील तज्ज्ञता,
- ना वडिलोपार्जित संपत्ती,
- ना शेअर मार्केटमधले ज्ञान.
मग कराडने इतके कोटी कसे कमावले?
- गुन्हेगारी व चौकशी:
- इतकी संपत्ती असूनही कराड कोणत्याही तपास यंत्रणेच्या रडारवर कसा नाही?
- पोलिस, ईडी, आणि कायदेमंडळाने त्याच्याकडे का दुर्लक्ष केले?
- तुलना:
- बीड जिल्ह्यातच तुकाराम मुंढे यांसारखे प्रामाणिक अधिकारी संघर्ष करून आयएएस झाले. त्यांनी नेहमी प्रामाणिकतेने काम केले, त्यांना सतत बदल्यांचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही.
- दुसरीकडे त्याच समाजातील वाल्मिक कराड, ज्याने फक्त चुकीच्या मार्गांनी माया जमवली.
निष्कर्ष:
वाल्मिक कराडसारखे अनेक जण अजूनही महाराष्ट्रात आहेत, ज्यांची संपत्ती आणि कारवाया जगासमोर आलेल्या नाहीत. आपल्या समाजात आदर्श कोण असायला हवा हे ठरवणे आपल्यावर अवलंबून आहे. प्रामाणिकता व मेहनतीच्या जोरावर तुकाराम मुंढे यांसारख्या लोकांना पुढे आणायचं की कराडसारख्या व्यक्तींच्या चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन द्यायचं, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.