मागील आठवड्यात ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले. त्यानंतर उत्सुकता लागली ती त्यामध्ये अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या नुकतेच २९ तारखेला टी सिरीजने या चित्रपटातील राम सिया राम हे भजन रिलीज केले.
या गाण्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि माता जानकी यांची प्रेम कहाणी आणि विरह दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.आज हे गाणे यु ट्यूबवर क्रमांक एक वरती ट्रेंड करत आहे.प्रेक्षकांना हे गाणे आवडले असून आवघ्या काही तासातच लाखो लोकांनी हे गाणे पाहिले.
‘राम सिया राम’ भजन
चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.मागील आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला जेवढी पसंती दिली होती तेवढीच पसंती राम सिया राम या गाण्याला मिळत आहे. प्रभू श्री राम आणि माता जानकी वर हे भजन चित्रित करण्यात आले आहे. प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या ब्लॉक बस्टर फिल्मची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
‘आदिपुरुष’ चे किती कोटीला विकले राईटस
Adipurush ६ जून ला प्रदर्शित होत आहे. आजून चित्रपट प्रदर्शित व्हायला 15 दिवस बाकी आहेत. सर्वांचे लक्ष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतोय याच्याकडे लागले आहे. पण त्याआधीच निर्मात्यांनी या चित्रपटाचे राईट्स विकून मोठी कमाई केल्याचे वृत्त आहे.
एक दिवसापूर्वी प्रभासने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘राम सिया राम’ हे गाणे रिलीज करून चाहत्यांना माहिती दिली होती. चित्रपटाच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे चे तेलुगू थिएटर राइट्स विकून मोठी रक्कम गोळा केल्याचे वृत्त आहे.आदिपुरुष पाच भाषांमध्ये रिलीज होत आहे त्यात हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. बातमी अशी आहे कि प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानचे तेलुगू थिएटर रिलीज राइट्स जवळपास 170 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आता हिंदी आणि त्याबरोबर इतर भाषांचे राईट्स किती कोटींना विकले जाणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभासचा ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर आणणार त्सुनामी, जाणून घ्या.
देवदत्त नागे प्रभास सोबत Adipurush मध्ये भगवान हनुमानाची भूमिका करतोय
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.