अभिनेत्री Aarti Mittal ला वेश्या व्यवसाय रॅकेट प्रकरणी मुंबईत Arrest.

ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेत्री Aarti Mittal ला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.तिच्या वर फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेश्याव्यवसाय रॅकेट चालवण्याचा आणि ग्राहकांना मॉडेल पुरवल्याचा आरोप आहे.
Aarti Mittal

कोण आहे हि Aarti Mittal ?

Aarti Mittal च्या  इंस्टाग्राम वरून  असे कळते कि, आरती मित्तल कास्टिंग डायरेक्टर आणि इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करते. आरतीने अनेक दूरदर्शन मालिका आणि वेब शो मधून काम केले आहे,तिच्या आत्ताच्या नवीन हिंदी मालिका ‘अपनापन – बदलते रिश्तों का बंधन’ आहेत. ज्यात राजश्री ठाकूर आणि सेझन खान सुद्धा आहेत.तिने ‘ना उमर की सीमा हो’ या मालिकेत देखील काम केले आहे.

इंस्टाग्रामवर तिचे एक लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. आरती मित्तल ने अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन कलाकारांसोबत तिचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने हितेन तेजवानी, रोहित रॉय, मानव गोहिल, अमन वर्मा आदीं सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

इतकंच नाही तर सतीश कौशिकच्या ‘कर्म युद्ध’मध्येही तिने भूमिका केली होती. याशिवाय Aarti Mittal ने ‘ये है चाहतीं’, ‘धरमपत्नी’, ‘सनक: एक जुनून’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Aarti Mittal

कशी सापडली Aarti Mittal ?

17 एप्रिलला मुंबईच्या पोलीस गुन्हे अन्वेशन विभागाने नकली गिऱ्हाईक बनून गोरेगाव येथे एका हॉटेलवर छापा टाकला आणि एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

दोन मॉडेल्सना नंतर घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. झूमने दिलेल्या वृत्तानुसार, आरती मित्तल जी ओशिवराची रहिवासी आहे, ती मॉडेल्सना वेश्याव्यवसायात अडकवायची. आरतीने मॉडेल्सना भरमसाठ रकमेचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकवले.

पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना त्यांच्या सूत्रांकडून या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी आरतीशी ग्राहक म्हणून संपर्क साधला. इन्स्पेक्टरने तिला त्याच्या दोन मित्रांसाठी दोन मुली पाठवण्यास सांगितले आणि आरतीने मनोजच्या सेलफोनवर त्यांचे फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी मुलींना पाठवण्यासाठी 60,000 रुपयांची मागणी केली.

अधिकाऱ्याने सांगितले  की Aarti Mittal ने  त्याच्या फोनवर दोन मॉडेल चे फोटो पाठवले आणि मॉडेल एकतर जुहू किंवा गोरेगाव-येथील  हॉटेलमध्ये येतील. त्यानंतर मनोज सुतारने गोरेगावमधील दोन खोल्या बुक केल्या आणि ग्राहकांच्या वेशात आलेल्या दोन निरीक्षकांना पाठवले

जेव्हा आरती मॉडेल्ससह आली तेव्हा तिने नकली  निरीक्षकांना गर्भनिरोधक दिले. हे सर्व गुप्तचर कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे.पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकताच तिला रंगेहात पकडले. आरती मित्तलl वरती  आयपीसीच्या कलम 370 आणि मुलींच्या तस्करीच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात, सुटका करण्यात आलेल्या मॉडेल्सनी आरती मित्तल ची वेश्याव्यवसायात येण्याची मागणी मान्य केल्यावर त्यांना प्रत्येकी 15,000 रुपये मिळतात असे सांगितले.

Related News

Mumbai police busts sex racket, actress, casting director Aarti Mittal arrested for alleged involvement.

Leave a comment