Ashish Vidyarthi : अभिनेता आशिष विद्यार्थीने केले लग्न

अभिनेता Ashish Vidyarthi यांनी फॅशन उद्योजक असलेल्या रूपाली बरुआ यांच्याशी लग्न केले आहे.

अनेक हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि अधिक प्रादेशिक चित्रपटांमध्ये दिसलेल्या या अभिनेता आशिष विद्यार्थी यांना पुन्हा प्रेम मिळाले आहे. गुरुवारी कोलकत्ता येथील क्लबमध्ये एका समारंभात अभिनेता Ashish Vidyarthi यांनी फॅशन उद्योजक असलेल्या रूपाली बरुआ यांच्याशी लग्न केले आहे.

Ashish Vidyarthi Married

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी पूर्वीची अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ हिच्याशी लग्न केले होते. आता त्यांनी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली आहे. ज्या आसामच्या गुवाहाटीच्या असून त्या एका अपस्केल फॅशन स्टोअरशी संबंधित आहेत.

आशिष आणि रूपालीने सकाळी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत शांतपणे रजिस्ट्री लग्न केले. “माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक विलक्षण भावना आहे असे अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी आपले मत व्यक्त केले. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर संध्याकाळी गेट-टूगेदर होते,” असे अभिनेता आशिष विद्यार्थी म्हणाले.

मग तुमची भेट कशी झाली ? असा प्रश्न विचारताच आशिष विद्यार्थी यांनी हसून अरे, ही एक लांबलचक गोष्ट आहे, ते नंतर कधीतरी शेअर करू. असे उत्तर दिले. यावर रुपाली पुढे म्हणाली, कि आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि त्यानंतर हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

पण आमचे लग्न हे एक छोटेसा कौटुंबिक समारंभ असावा अशी आम्हा दोघांची इच्छा होती. पडद्यावर जटिल, गडद भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्याकडे तिला कशामुळे आकर्षित केले याबद्दल बोलताना, ती हसतमुख म्हणाली: “तो एक सुंदर माणूस आहे.

हे लग्न हे दोघांच्या संस्कृतींचे मिश्रण होते. लग्नानंतर औपचारिक स्वागत करण्यात आले.

कामाच्या आघाडीवर,आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये 11 भाषांमध्ये काम केले आहे. 1995 मध्ये द्रोहकाल या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सध्या, अभिनयासोबतच तो एक दशलक्षाहून अधिक सदस्यांसह एक YouTube चॅनेल देखील चालवत आहे जिथे तो Food व्लॉग करतो.

Ashish Vidyarthi marries Kolkata fashion entrepreneur.

Madhubala : अनारकली A Timeless Beauty of Bollywood

Leave a comment