लाडक्या बहीणींना दिलासा: या अटी रद्द

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Image-Google

Ladki Bahin Yojana महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसकल्प 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिलांना आधार मिळणार आहे
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना.

योजनेतील सुधारणा व बदल

मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana योजनेच्या अटीत राज्य शासनाने बुधवारी सुधारणा केली. त्यामुळे लाडक्या बहिणीना दिलासा मिळाला आहे. वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे आणि उत्पन्न व आधिवास दाखल्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता या योजनेचा कुटुंबातील एका अविवाहित मुलीलाही लाभ घेता येणार आहे. याबाबतीत सुधारी आदेश राज्य शासनाने जारी केला आहे आहे.

Must read : Apply for Driving Licence | ऑनलाईन वाहन परवाना मिळवा त्वरित

जमिनीची अट रद्द

Ladki Bahin Yojana या योजनेसाठी ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सामूहिक पाच एकरपेक्षा ज्यादा शेतजमीन असेल तर, त्यांना यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते, आता मात्र ही शेतजमिनीची अटच रद्द करण्यात आली आहे त्यामुळे पाच एकरपेक्षा ज्यास्त जमीन असणाऱ्याना देखील याचा लाभ घेता येणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Image-Google

आवश्यक कागदपत्रे:

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • उत्पन्न दाखला
 • रहिवाशी दाखला
 • आधारकार्ड
 • रेशनकार्ड
 • बँक पासबूक
 • फोटो
 • हमीपत्र

काही महत्वाचे:

1) Majhi Ladki Bahin Yojana या योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवून ती दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली आहे, तसेच दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलाना दि. 01 जुलै 2024 पासून दर माह रु. 1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

2) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे

 • रेशन कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
 • जन्म दाखला

या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

3) Majhi Ladki Bahin Yojana या सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 65 वर्ष करण्यात आले आहे.

4) परराज्यात जन्म झालेल्या महिलानी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अश्या बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

5) रु. 2.5 लाख उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.

6) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana घरीही भरता येणार अर्ज

Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलाना घरीही मोबाइलद्वारे अर्ज भरता येणार आहे. याकरिता “नारी शक्ति दूत” हा अॅप विकसित करण्यात आला आहे. याद्वारे अर्ज भरल्यानंतर त्या अर्जासमावेत ऑनलाइन जोडलेल्या कागदपत्रांचा एक सेट संबंधित गावातील अंगणवाडी सेविका अथवा शहरी भागातील वार्ड अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.

पैसे मागितल्यास परवाना रद्द

Ladki Bahin Yojana साठी अर्ज भरताना कोणीही एजंटच्या नादी लागू नये. एजंट असतील तर तत्काळ त्याबाबतची रीतसर तक्रार करा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. ज्या सेतु सुविधा केंद्रावर पैसे उकळण्याचा प्रयत्न होईल अथवा कोणत्याही शासकीय कर्मच्याऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आढळून आल्यास त्या शासकीय कर्मच्याऱ्यांचा व सेतु सुविधा केंद्रांचा प्रसंगी परवाना रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Must read : ग्राहक सेवा केंद्र कसे उघडायचे ? त्यासाठी या स्टेप फॉलो करा

Majhi Ladki Bahin Yojana अर्ज प्रक्रिया:

 • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: Majhi Ladki Bahin Yojana या योजनेसाठी मोबाइलमध्ये “नारी शक्ति दूत” पोर्टल वर आपला अर्ज भरू शकता. अथवा माझी लाडकी बहीण या वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज करू शकता.
 • ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: आपण आपल्या क्षेत्रातील महानगर पालिका कार्यालय / जिल्हा अधिकारी कार्यालय / ग्रामपंचायत मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्या आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज जमा करा.

FAQs

योजनेसाठी कोण पात्र आहे?

21 ते 65 वर्षे वयोगटातील.
महाराष्ट्रातील रहिवासी.
विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांचा समावेश आहे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहिण योजना 2024 काय आहे?

माझी लाडकी बहिण योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. पात्र महिलांना अधिक स्वावलंबी होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यात मदत करण्यासाठी त्यांना दरमहा ₹१,५०० प्राप्त होतील.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी मी अर्ज कसा करू शकतो?

महिलांना घरीही मोबाइलद्वारे अर्ज भरता येणार आहे. याकरिता “नारी शक्ति दूत” हा अॅप विकसित करण्यात आला आहे. याद्वारे अर्ज भरल्यानंतर त्या अर्जासमावेत ऑनलाइन जोडलेल्या कागदपत्रांचा एक सेट संबंधित गावातील अंगणवाडी सेविका अथवा शहरी भागातील वार्ड अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.

Leave a comment

आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय ! हे पदार्थ अमृतापेक्षा कमी नाहीत John Cena : जॉन सीनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ? तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. Sunil Gavaskar चे लिटल मास्टर नाव कसे पडले? पावसाळ्यातील सर्दी साठी सर्वोत्तम घरगुती उपाय नीतू सिंग ते नीतू कपूर या गोष्टी माहित आहेत का ?
आषाढी एकादशी बद्दल हि माहिती तुम्हाला आहे का? विठोबाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला जाते? पावसाळ्यात गूळ खाण्याचे फायदे. यावरून समजेल तुम्हाला डेंगू झालाय ! हे पदार्थ अमृतापेक्षा कमी नाहीत John Cena : जॉन सीनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ? तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. Sunil Gavaskar चे लिटल मास्टर नाव कसे पडले? पावसाळ्यातील सर्दी साठी सर्वोत्तम घरगुती उपाय नीतू सिंग ते नीतू कपूर या गोष्टी माहित आहेत का ?