OMG 2 ची रिलीज डेट जाहीर अक्षय कुमार दिसणार भगवान शिवच्या भूमिकेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
OMG 2
OMG 2 Image : Akshay Kumar Instagram

तब्बल 11 वर्षांनी येतोय OMG 2 अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ओ माय गॉड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला होता.

बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या पहिल्या भागानंतर OMG चा सिक्वेल ओ माय गॉड 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2021 मध्ये या चित्रपटाचे शुटींग मध्यप्रदेश मध्ये सुरु झाले होते. अक्षय कुमार सोबत या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अक्षय कुमारने ओ माय गॉड 2 या चित्रपटाची अधिकृत घोषणा आपल्या सोशल मिडीया अकाऊंट वरून केली. सोबत चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले: “OMG 2 साठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असाव्यात. एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर विचार करण्याचा आमचा प्रामाणिक आहे. या प्रवासात आदियोगींची शाश्वत ऊर्जा आम्हाला आशीर्वाद देईल. ”

OMG 2 प्रदर्शन तारीख

Instagram वर त्याने हा चित्रपट 11 ऑगस्ट, 2023 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ओ माय गॉड 2 चे नवीन पोस्टर टाकले आहे. ज्यामध्ये तो भगवान शिव च्या वेषात आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे “आ रहे है हम, आएगा आप भी. 11 ऑगस्ट. थिएटरमध्ये.

पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान श्री कृष्णाच्या भूमिकेत होता तर ओह माय गॉड २ मध्ये तो भगवान शिवाच्या भूमिकेत असेल. यामी गौतमने तेच पोस्टर शेअर करत तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले: “आमच्या OMG 2 चित्रपटाची घोषणा करताना आनंद होत आहे! या खास चित्रपटासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.”

OMG 2 केप ऑफ गुड फिल्मची निर्मिती असून लेखक दिग्दर्शक अमित राय आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात परेश रावल यांना दाखवले होते, जो भूकंपात त्याचे दुकान उद्ध्वस्त केल्याबद्दल देवाविरुद्ध गुन्हा दाखल करतो.

Read more: OMG 2 ची रिलीज डेट जाहीर अक्षय कुमार दिसणार भगवान शिवच्या भूमिकेत

जिथे जिथे आदिपुरुष चा शो असेल तिथे तिथे हनुमानजी साठी एक खुर्ची रिकामी ठेवा ओम राऊत यांना अश्रू अनावर ….

पावनखिंड च्या यशानंतर रामशेज चित्रपटाच्या पोस्टर ने सर्वांचे लक्ष वेधले.

Leave a comment

नम्रता शिरोडकर आहे या प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्याची पत्नी… भुवन बम : कोविडमध्ये आईबाप गमावले तरी मागे हटला नाही… डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी हि माहिती तुम्हाला आहे का ? सुषांतसिंग रजपुतचा शेवटचा चित्रपट कोणता माहिती आहे का ? “विमान प्रवासात तुम्हाला या सुविधा दिल्या जातात ज्या तुम्हाला…
नम्रता शिरोडकर आहे या प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्याची पत्नी… भुवन बम : कोविडमध्ये आईबाप गमावले तरी मागे हटला नाही… डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी हि माहिती तुम्हाला आहे का ? सुषांतसिंग रजपुतचा शेवटचा चित्रपट कोणता माहिती आहे का ? “विमान प्रवासात तुम्हाला या सुविधा दिल्या जातात ज्या तुम्हाला…