सुजय डहाके दिग्दर्शित Shyamchi Aai हा चित्रपट २०२३ च्या १० नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट पांडुरंग सदाशिव साने यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Shyamchi Aai वादाचे मुख्य कारण
श्यामची आई वादाचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाणी यांची जुन्या “श्यामची आई” चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाण्यांशी हुबेहुब जुळणी दिसून आली.
जुना शामची आई चित्रपट आचार्य अत्रे लिखित दिग्दर्शित आहे.नवीन येणारा सुजय डहाके दिग्दर्शित शामची आई हा चित्रपट देखील Black & White असून त्यातील गाणी प्रसंग हे हुबेहूब जुन्या चित्रपटाशी मिळते जुळते आहेत.यासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याचा आरोप दिग्दर्शक निर्माता सुजय डहाके यांच्यावर करण्यात आला आहे.
हे हि वाचा – New Release Movies 2023 सलमान सोसायटी
यामुळे चित्रपट निर्मात्यांना कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा आरोप बीना पै यांनी केला आहे.बीना पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या कवयित्री शिरीष पै यांच्या स्नुषा आहेत.
याच आरोपामुळे चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. काही समजदारांनी चित्रपटाच्या कथाप्रसंग आणि गाण्यांमध्ये फरक असल्याचा दावा केला. मात्र, अनेकांनी चित्रपट निर्मात्यांना कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला.
या वादावर चित्रपट निर्मात्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चित्रपटातील कथाप्रसंग आणि गाणी ही मूळ कादंबरीवर आधारित आहेत. त्यामुळे त्यात कॉपीराइट कायद्याचा भंग झालेला नाही.शामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकाचा आजही जनमानसांवर प्रभाव आहे.आणि अशा चुकीच्या समजाने हा चित्रपट वादग्रस्त ठरावा हे खूप दुख:दायक आहे.
हे हि वाचा – Netflix New Releases The Railway Men
या वादाचा चित्रपटावर काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे. मात्र, हा वाद मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
या वादावर तुमचे काय मत आहे?
इथे पहा ट्रेलर – श्यामची आई | SHYAMCHI AAI | OFFICIAL TRAILER | SUJAY DAHAKE | GAURI DESHPANDE | OM BHUTKAR | 10 NOV
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.