सुनील दत्त ( बलराज दत्त ) जन्म 6 जून 1929  अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी 

Image : Pintrest

सुनील दत्त यांचा जन्म नक्का खुर्द, झेलम जिल्हा, पंजाब प्रांत, ब्रिटिश भारत (आता पंजाब, पाकिस्तान) येथे मोह्याल ब्राह्मण कुटुंबात बलराज दत्त या नावाने  झाला. 

Image : Pintrest

सुनील दत्त हे 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रमुख कलाकारांपैकी एक होते.

Image : Pintrest

करिअरची सुरुवात त्यांनी  रेडिओपासून सुरु केली. उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवून, सुनील दत्त दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन रेडिओ सिलोनच्या हिंदी सेवेवर प्रचंड लोकप्रिय होते. 

Image : Pintrest

त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि 1955 च्या रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये त्यांची खरी ओळख निर्माण झाली.

Image : Pintrest

सुनील दत्त यांचे  खरे नाव बलराज दत्त होते. पण ज्येष्ठ अभिनेते बलराज साहनी यांच्या नावामुळे दिग्दर्शक सैगल यांनी  या नव्या अभिनेत्यासाठी "सुनील दत्त" हे  स्क्रीन नाव दिले.

Image : Pintrest

1957 मदर इंडिया या चित्रपटाने दत्त यांना  स्टारडम मिळवून दिला. ज्यामध्ये त्यांनी नर्गिससोबत तिच्या रागीट मुलाचा रोल केला होता.

Image : Pintrest

मदर इंडिया या चित्रपटाच्या यशानंतर नर्गिस यांच्याशी 1958 मध्ये सुनील  दत्त यांनी  लग्न केले.

Image : Pintrest

1968 मध्ये, सुनील  दत्त यांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले. National अवार्ड सह Film फेअर अवार्ड अश्या  बऱ्याच पुरस्कारांनी ते सन्मानित होते.

Image : Pintrest

दत्त यांचे ७६ व्या वाढदिवसापूर्वी २५ मे २००५ रोजी वांद्रे, पश्चिम मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

Image : Pintrest

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कधी न पाहिलेली आकर्षक पेंटींग्ज  

Image : Pintrest