Adipurush पहिल्याच दिवशी का आपटला ?

Adipurush
Devdatt Nage Image : Google

Adipurush ची चर्चा सोशल मिडीयावर गेले कित्येक दिवस या ना त्या कारणाने रंगली होती.चाहत्यांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या पण आदिपुरुष रिलीज झाला आणि चाहत्यांच्या अपेक्षांचा अक्षरश: चक्काचूरझाला. प्रेक्षक ज्या अपेक्षेने चित्रपट पाहण्यास गेले त्या अपेक्षा आदी पुरुष पूर्ण करू शकला नाही.

सहाशे कोटींचे बजेट, VFX, गाणी असा आवाढव्य खर्च करून सुद्धा Adipurush रिलीजच्या पहिल्याच दिवशी सपशेल आपटला. रिलीजच्या आठवडाभर आधीपासून हर भारतीय की आदी पुरुष असा ट्रेंड असणारा आदिपुरुष रिलीज नंतर बॉयकट ट्रेंड मध्ये बदलला आणि याला कारणे सुद्धा खूप आहेत.

डायलॉग

कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का | आग भी तेरे बाप की, और जलेगी भी तेरी | हा कुठल्या साऊथच्या चित्रपटातील डायलॉग नाही, तर हा डायलॉग आहे आदिपुरुषमधील हनुमानाचा.

इंद्रजीत हनुमानाच्या शेपटीला आग लावतो आणि विचारतो जली ना, अभी तो और जलेगी | जिसकी जलती है वही जाणता है | आणि याला उत्तर म्हणून हनुमान इंद्र्जीतचा बाप काढतो. असे अनेक माती खाणारे डायलॉग भरभरून आहेत.

लंकेत घुसलेल्या हनुमानाला रावण म्हणतो. तेरी बुवा का बगीचा है क्या ? जो हवा खाने चला आया त्यावर हनुमान काय म्हणतो. अगर कोई हमारे बहनों को छेडेगा, तो हम उनकी लंका लगा देंगे | अशा टुक्कार डायलॉगचा भरणा करताना निर्माते विसरले असावेत कि आपले डायलॉग कोणाच्या तोंडातून येणार आहेत.

Adipurush
Adipurush Ravan Image : Google

कल्पनेपलीकडील रावण

Adipurush च्या ट्रेलर मध्ये जरी निळ्या रंगाचा रावण झाकण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो तसाच आहे. रावणाला दहा डोके दाखवण्यात आले असले तरी कुठले डोके कुठे पाहतय,पाच डोकी वर तर पाच खाली कशाचा कशाला मेळ नाही.

या जगात रावणासारखा शिवभक्त अजून जन्माला आलेला नाही हे तर आपल्याला माहितीच आहे ज्या रावणाने शिवतांडव स्तोत्राची रचना केली. अशा या विद्वान प्रकांड पंडिताला चक्क अजगराच्या मंचकावर झोपताना दाखविले आहे.

VFX

VFX ची क्वालिटी पहायला मिळते ती लंका जाळल्याच्या सीनमध्ये हनुमानाच्या मागे लागलेली असुर सेना अगदी कार्टून मध्ये दाखवतात तशी दाखवली आहे. प्रभासच्या बाहुबलीचे उदाहरण घेतलं तर महालापासून लढाई पर्यंत लार्जर देन लाईफ वाटत होतं आधी पुरुष मध्ये रावणाची सोन्याची लंका आणि प्रचंड हिरवेगार अशोक वाटिक या दोन्ही गोष्टी भव्य दिव्य दाखवता आल्या असत्या पण VFX ने इथे सुद्धा माती खाल्ली आहे. खतरनाक VFX बघायला मिळणार म्हणून लोक आदिपुरुष बघायला जातात आणि कार्टून किंवा व्हिडिओ गेम्सचा फील घेऊन बाहेर येतात.

Adipurush
Adipurush Vs Ramayan Image : Google

कथानक

रामायणाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.त्यामुळे यात कधी काय होतं हे सगळं आपल्याला पाठ आहे.त्यामुळे Adipurush मध्ये काहीतरी सस्पेन्स पहायला मिळेल हि अपेक्षाच प्रेक्षकांची न्हवती.पण इथे मूळ कथानक बाजूलाच राहते.

चित्रपट चालू होतो ते थेट वनवासाच्या स्टोरी पासून ना कुठल्या पात्राची बॅक स्टोरी आहे ना कुंभकर्णाचा झोपेतून उठण्याचा सीन आहे आणि ना बिबीशन श्रीरामाला मदत करताना ची गोष्ट आहे.या आधी रामायणावर आलेल्या सिनेमा सिरीयल मध्ये जटायू आणि रामाचा इमोशनल सीन आहे पण इथे श्रीराम आणि जटायु मध्ये दोन शब्दांचा संवादही होत नाही.

आपण लहानपणापासून जे बघत आलो आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीच स्टोरीत नाहीये आणि जे आहे तेही अर्धवट किंवा भलतंच

वेशभूषा

प्रभू श्री रामाची प्रतिमा सर्वसामान्याच्या मनात जरी आली तरी अजून हि अरुण गोविल यांनी साकारलेली रामायणातील श्री रामाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भगवं वस्त्र परिधान केलेलं ते सोज्वळ रूप भरताने जपून ठेवलेल्या पादुका, पण इथे मात्र श्रीरामाने चामड्याचे जॅकेट आणि बूट घातले आहेत.एका सीन मध्ये तर पाय घोळ पांढरा ड्रेस घातलेले श्रीराम आपल्याला दिसतात.

रावणाच्या कपड्यांचा तर कहरच केला आहे.सोन्याच्या लंकेचा अधिपती असणारा रावण कधी टी-शर्ट तर कधी कुर्ता घालतो. स्पाईक वाली हेअरस्टाईल करतो पण डोक्यावर मुकुट मात्र घालत नाही.

एका छोट्या खारीने सेतू बांधण्यात मदत केली म्हणून श्रीरामांनी खारीच्या पाठीवरून बोट फिरवली ती खूनअजूनही खारीच्या पाठीवर दिसते इतकी साधी सोपी गोष्ट आपण ऐकत आलो. पण आदिपुरुषमध्ये श्रीराम वानर सेनेला मोटिवेशनल स्पीच देतात आणि युद्धाला तयार करतात असे दाखविण्यात आले आहे.

रामानंद सागर यांनी डायरेक्ट केलेल्या रामायण सिरीयलचा रिपीट टेलिकास्ट लॉक डाऊनच्या काळात दाखवला होता. त्यात रावणाचं पात्र साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदिना खऱ्या आयुष्यात अयोध्येत प्रवेश नाकारण्यात आला होता. इतका त्या भूमिकेचा प्रभाव लोकांच्या मनावर झाला होता.

श्रीरामाच्या दिसण्यापासून रावणाच्या हसण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आजही अनेकांना जशीच्या तशी आठवते ती रामानंद सागर यांच्या डायरेक्शनमुळे व्यक्तिमत्व किती मोठं आहे हे दाखवायला रावणाला गेम ऑफ थ्रोन्सचा विलन करणं गरजेचं न्हवत. तर युद्धापलीकडचा कर्तव्यनिष्ठ महापराक्रमी आणि तितकाच मायाळू श्रीराम दाखवणे गरजेचे होतं जे रामानंद सागर यांना जमलं

असो तुम्ही जर Adipurush पाहिला असेल तर आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा…

Read more: Adipurush पहिल्याच दिवशी का आपटला ?

Jaane Kahan Mera Jigar Gaya Ji : कलर मध्ये पाहिलत का ?

Good News You Tube 500 सब्स्क्रायबरला देणार

Leave a comment

Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा ..
Man City vs Real Madrid 2023/24 सलमान खानच्या आई बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी हि आहे अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणची बायको या आभासी फनी फोटोग्राफीची कमाल पाहिलीत का ? हे क्रिकेटर लहान मुलाच्या वेशात असे दिसतात तुम्हाला ओळखतात का पहा ..