Miyazaki Mango 2 लाख रुपये किलो- Boost Your Mango Farming Revenue with Smart Security Measures

जबलपूर ( मध्य प्रदेश ) : आंबा आपल्यापैकी बहुतेकांसाठी मौल्यवान आहे.पण किती मौल्यवान? याचा अंदाज लावणे कठीण आहे. बरं, तुम्ही जपानमधील Miyazaki Mango बद्दल ऐकले आहे का ? की ज्याची किंमत प्रति किलो दोन लाख सत्तर हजार रुपये आहे!

Miyazaki Mango
Miyazaki Mango

काय ? हे खरं आहे ?

होय! तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. जबलपूरमधील हिनौता गावातील एका शेतकऱ्याने जपानचा मियाझाकी नावाचा आंबा पिकवला असून तो आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख सत्तर हजार रुपये प्रति किलो दराने विकला जातो. एवढेच नाही तर नेपाळ, चीन आणि अमेरिकेतील आठ परदेशी जातींसह २६ जातींचे आंबे त्यांनी पिकवले आहेत.

आंबा फार्मसाठी स्मार्ट सुरक्षा उपाय

आता एवढ्या महागातला आंबा म्हंटल्यावर लोकांची त्यावर नजर पडणार आणि चर्चा तर होणारच मग अशा या मौल्यवान मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी आलीच. पण शेतकरी जर हुशार असला तर तो काहीही करू शकतो. अशाच या शेतकऱ्याने एक शक्कल लढवली आणि आपली आंब्याची बाग चक्क हाय-टेक सुरक्षा कॅमेरे लावून सुरक्षित केली आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर या सुरक्षेसाठी काही कुत्रे आणि चौकीदार सुद्धा तैनात केले आहेत.

आंब्याच्या बागेचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी सांगितले की, मागील वर्षी त्यांच्या बागेत चोरीच्या अनेक घटना घडल्या. कि ज्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्यांनी हाय-टेक कॅमेरा, कुत्रे आणि चौकीदारांचा पर्याय निवडला.Miyazaki Mango ची वाढती मागणी आणि त्यांना दिलेला उच्च दर यामुळे आधुनिक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.

Miyazaki Mango
Miyazaki Mango

आंब्याच्या जाती 

Miyazaki Mango व्यतिरिक्त त्यांच्या शेतात जंबो ग्रीन आंबा देखील आहे, ज्याला तलाला गिर केसर आंबा, जपानी वांगी, तैयो नो तामांगो असेही म्हणतात. नेपाळमधील केसर बदाम आंबा, चीनमधील आयव्हरी, बाला मॅंगिफेरा ‘टॉमी’ अटकिन्स, ज्याला ब्लॅक मॅंगो म्हणूनही ओळखले जाते, फ्लोरिडा, यूएसए येथील जातीचे आंबे त्यांच्या शेतात डोलताना दिसतात.

संकल्प सिंह परिहार यांच्या बागेत आठ आंतरराष्ट्रीय आंब्यांच्या जातींसह दोन डझनहून अधिक भारतीय आंब्याच्या जाती सुद्धा लावण्यात आल्या आहेत. पुढे संकल्प सिंह म्हणाले की, जपानचा हा Miyazaki Mango जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. याचे उत्पादन फक्त जपानच्या मियाझाकी प्रांतात घेतले जाते. लाखात किंमत असल्याने त्याचा जपानमध्ये लिलाव होतो. आणि भारतीय चलनात त्याची किंमत 2.7 लाख रुपये आहे.

“आयव्हरी’ हि आंब्याची जात चीनमध्ये आढळते, हा एक आंबा 2 किलोग्रॅमचा असतो  . या आंब्याचे सरासरी वजन 2 ते 3 किलोपर्यंत असते. हे आंबे एक फूट ते दीड फूट लांब असतात. जानेवारी महिन्यात याच्या झाडांना मोहोर येतो आणि जूनच्या अखेरीस फळे तयार होतात. त्यांच्या कर्नलचे वजनही 100 ते 200 ग्रॅम असते. ते इतर आंब्यांपेक्षा मोठे आणि वेगळे दिसतात, असेही ते म्हणाले.

पारंपारिक शेती तंत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाला जोडून, परिहार सारख्या शेतकर्‍यांनी हे दाखवून दिले आहे की उच्च तंत्रज्ञान सुरक्षा प्रणालीचा योग्य वापर करून  कृषी उत्पादन सुरक्षित कसे करता येत.

Reference

MP: Jabalpur farmer grows mango costing Rs 2.7 Lakh per kg, guards it with high security cameras, dogs
Hilarious Facts : तुम्हाला कदाचित माहित नसतील.
Native Earth Nursery Purple Miyazaki Mango plant
 

Leave a comment