MPL Final 2023 मध्ये रत्नागिरी जेट्सची दमदार एन्ट्री! विजय पावले ठरला विजयाचा शिल्पकार.

MPL Final 2023
MPL Final 2023

टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार

MPL Final 2023 : विजय पावले हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा खेळाडू असून आतापर्यंत त्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रमाची नोंद आहे. दुबई येथील शारजहा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तो अनेक वेळा भारतीय संघाचा भाग राहिला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस विश्वात त्याने आपली वेगळी छाप पाडलीये. MPL 2023 मध्ये तो रत्नागिरी जेट्स या संघाकडून खेळत आहे.

हे हि वाचा : सांगलीच्या विजय पावलेची एमपीएल स्पर्धेसाठी निवड….

MPL Final 2023 मध्ये रत्नागिरी जेट्सची दमदार एन्ट्री!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग ( MPL Final 2023 ) मध्ये रत्नागिरी जेट्सची दमदार एन्ट्री घेतली आहे. स्पर्धेत सोमवारी क्वालिफायर एक सामना खेळण्यात आला. गहुंजे येथील एम.सी.ए. स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

सोमवारी पावसामुळे हा सामना उशिरा सुरु झाला.या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणल्यामुळे प्रत्येकी 15 षटकांच्या केलेल्या या सामन्यातील दुसरा डाव मात्र मंगळवारी सकाळी खेळला गेला. ‌रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 136 धावा केल्या होत्या.

MPL Final 2023
MPL Final 2023

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले या गावचा स्टार क्रिकेट खेळाडू विजय पावले यांने टाकलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी संघाने चार धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी धडक मारली. त्याचे क्रिकेट प्रेमींच्याकडून कौतुक होत आहे.

MPL चे स्वरूप आयपीएल सारखेच आहे ज्यामध्ये प्रत्येक संघ दुहेरी राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळेल आणि त्यानंतर क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल खेळेल. या स्पर्धेचा फायनल सामना गुरुवार, २९ जून रोजी होणार आहे.

एमपीएल ही 2009 मध्ये राज्य समितीने आयोजित केलेली पहिली T20 स्पर्धा होती. तीन हंगामांनंतर, 2009-2011 पर्यंत, जवळपास एक दशकानंतर या स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2023 गुण फलक

महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2023 गुण फलक

NoTeamMatchWinLostTieNo
Result
PointsRun
Rate
Qualified
1Ratnagiri Jets65100100.590W.W.W.L.W.W.
2Kolhapur Tuskers6420080.568W.W.W.W.L.L.
3Puneri Bappa6330060.799L.L.L.W.W.
4Eagle Nashik Titans6330060.584W.W.W.L.L.
5Chhatrapati Sambhaji Kings514002-0.997L.L.L.L.W.
6Solapur Royals514002-1.353L.L.L.W.L.

MPL Final 2023 Live तुम्ही इथे पाहू शकता

थेट प्रवाह: फॅनकोड App . आणि वेबसाइट
टीव्ही : डीडी स्पोर्ट्स

FAQs

महाराष्ट्र प्रीमियर लीग केव्हा सुरु झाले?

एमपीएल ही 2009 मध्ये राज्य समितीने आयोजित केलेली पहिली T20 स्पर्धा होती.

एमपीएल 2023 फायनल सामना कधी होणार?

एमपीएल 2023 फायनल गुरुवार, २९ जून 2023 ला होणार .

एमपीएल 2023 फायनल सामना कुठे होणार?

एमपीएल 2023 फायनल सामना २९ जून 2023 ला रात्री 8 वाजता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार.

एमपीएल 2023 मध्ये किती संघ सहभागी आहेत?

एमपीएल 2023 मध्ये एकूण सहा संघ सहभागी आहेत.

Read more: MPL Final 2023 मध्ये रत्नागिरी जेट्सची दमदार एन्ट्री! विजय पावले ठरला विजयाचा शिल्पकार.

ICICI World Cup Trophy 2023 अंतराळात लाँच

ऋतुराज गायकवाड अडकला उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात

Leave a comment

तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. या वर्षी हि थीम आहे वसुंधरा दिनाची “The Run Machines of IPL 2024″ पंकज त्रिपाठी: एका छोट्या गावातून सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा प्रवास Most expensive wine in the world आता जिओ सुद्धा देणार तुम्हाला कर्ज टॅटू काढायचा आहे ? या डिझाईन पाहिल्या का ? Madhubala : मधुबालाचे खरे नाव माहिती आहे का ? Nivedita Saraf : सोज्वळ चेहऱ्याची सोज्वळ अभिनेत्री Rati Agnihotri : A Legacy in Indian Cinema.
तुम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. या वर्षी हि थीम आहे वसुंधरा दिनाची “The Run Machines of IPL 2024″ पंकज त्रिपाठी: एका छोट्या गावातून सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा प्रवास Most expensive wine in the world आता जिओ सुद्धा देणार तुम्हाला कर्ज टॅटू काढायचा आहे ? या डिझाईन पाहिल्या का ? Madhubala : मधुबालाचे खरे नाव माहिती आहे का ? Nivedita Saraf : सोज्वळ चेहऱ्याची सोज्वळ अभिनेत्री Rati Agnihotri : A Legacy in Indian Cinema.