Scam 2003 The Telgi Story

अब्दुल करीम तेलगी ज्याने भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, स्टॅम्प पेपर घोटाळा घडवला होता. याच घोटाळयावरती आधारित 2 सप्टेंबर 2003 ला Scam 2003 The Telgi Story हि वेब सिरीज सोनी लिव्ह वरती रिलीज होतेय.

Scam 2003 - The Telgi Story
Scam 2003 The Telgi Story

हंसल मेहता दिग्दर्शित Scam 2003 The Telgi Story हि वेब सिरीज सोनी लिव्ह वरती १ सप्टेंबर २०२३ ला रिलीज होतेय. या आधी हंसल मेहताने Scam 1992 हि हर्षद मेहताने केलेल्या घोटाळया वरील आधारित सिरीज दिग्दर्शित केली होती.

तेलगी कोण होता ?

तेलगीचा जन्म 29 जुलै 1961मध्ये कर्नाटकातील खानपूर या गावी झाला.तेलगीचे आई आणि वडील दोघेही भारतीय रेल्वेत कर्मचारी होते.पण तेलगी सात वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.त्यामुळे तेलगीचे कुटुंब आर्थिक अडचणीत येऊ लागले.

यातच तेलगीने स्टेशन वर फळे विकण्याचा व्यवसाय केला पण त्यातून त्याला पुरेसे पैसे मिळत न्हवते .यातूनच आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत तेलगीने बी कॉम पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.

तेलगीने अनेक नोकऱ्या केल्या आणि सोडल्या त्यानंतर तो मुंबईला आला. मुंबईत आल्यानंतर त्याला समजले कि आखाती देशात नोकरी केल्यास खूप पैसा मिळतो म्हणून त्याने भारत सोडला आणि सौदी अरेबियाला गेला. त्याला सौदी मध्ये एक गोष्ट लक्षात आली कि या देशात येण्यासाठी अनेक लोकांच्या जवळ पासपोर्ट नाहीत.

तेलगी भारतात परत आला आणि त्याने अरेबियन मेट्रो TRAVALS नावाची एक कंपनी सुरु केली आणि तो लोकांना खोटे पासपोर्ट बनवून देऊ लागला. १९९१ मध्ये त्याला खोटे पासपोर्ट बनविण्याच्या आरोपाखाली पहिल्यांदा अटक झाली.

हे हि वाचा – Gadar 2 Box Office Collection

शिक्षा कि संधी

तेलगीला झालेली शिक्षा हि त्याच्यासाठी संधी ठरली.जेलमध्ये त्याची रामरतन सोनी नावाच्या माणसाबरोबर, रामरतन सोनी याचा स्टॅम्प पेपरचा धंदा होता इथेच त्याने बनावट स्टॅम्प पेपर बद्दल तेलगीला माहिती दिली.

जेलमधून सुटल्यानंतर काही काल तो सोनीकडेच बनावट स्टॅम्प पेपर विक्री करण्याचे काम करत होता.आणि यातून त्याला थोडे फार कमिशन मिळत होते. पण तेलगीला काहीतरी मोठे करायचे होते म्हणून त्याने यावर रिसर्च करायला सुरवात केली.

बनावट स्टँप पेपर

तेलगीने स्वतः बनावट स्टँप पेपर बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याने नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून जुनी मशीनरी खरेदी केली आणि बनावट स्टँप पेपर बनवण्यास सुरुवात केली.

तेलगीने आपल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी राजकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्याने त्यांना लाच देऊन त्यांचा पाठिंबा मिळवला. यामुळे त्याला बनावट स्टँप पेपर बिनधास्तपणे विकण्यास मदत झाली.

तेलगीने देशभरात 176 कार्यालये उघडली आणि त्याच्या माध्यमातून बनावट स्टँप पेपर विकण्यास सुरुवात केली. हे स्टँप पेपर बँका, विमा कंपन्या आणि सरकारी कार्यालये यांना विकले जात होते. काही वर्षातच तेलगीने सर्व भारतातील स्टँप मार्केटवर कब्जा केला.

2001पर्यंत तेलगीचा धंदा व्यवस्थित चालू होता.अशातच बेंगलोर पोलिसांना स्टँप पेपरने भरलेला एक ट्रक मिळाला चौकशी अंती निदर्शनास आले कि हा फार मोठा घोटाळा आहे सखोल चौकशी नंतर सर्व लिंक तेलगीकडे इशारा करू लागल्या तेलगीला याची खबर लागली आणि तेलगी अंडर ग्राउंड झाला. पण अखेर अजमेर शरीफ या दर्ग्यात आल्यानंतर नोहेंबर 2001 मध्ये तेलगीला अटक करण्यात आली.

नार्को टेस्ट आणि शिक्षा

तेलगीला अटक झाली पण तेलगी पोलीसांना कोणतीच माहिती देण्यास तयार न्हवता.म्हणून तेलगीची नार्को टेस्ट करण्यात आली यात तेलगीने सर्व प्रकरणाचा उलगडा केला आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर तेलगीला 2006 मध्ये 30 वर्षाचा सश्रम कारावास आणि 202 कोटीचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात तेलगीशिवाय अजून सहा लोकांना शिक्षा सुनावण्यात आली. तब्बल सोळा वर्षानंतर म्हणजे 2016 ला शिक्षा भोगत असताना जेलमध्येच तेलगीचा मृत्यू झाला.

तेलगीची लव्हस्टोरी

तेलगी रोज बार मध्ये जायचा नेहमी प्रमाणे मुंबईच्या टोपाझ बारमध्ये तेलगी गेला आणि त्या बारमधील एका बार बालेवर तो इतका फिदा झाला कि त्याने त्या बार बालेवर एका रात्रीत 93 लाख रुपये उधळले.तेलगीने पैसे उडवलेल्या त्या बारबालेचे नाव होते तरन्नुम खान तेलगीची नजर पडलेली हि बार बाला थोड्याच दिवसात मुंबईची नंबर वन बारबाला बनली.

Scam 2003 The Telgi Story सिरीजवर आक्षेप

अब्दुल करीम तेलगी ची मुलगी साना आणि जावई यांनी Scam 2003 The Telgi Story या सिरीजवरती आक्षेप घेतला आहे आणि कोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्हाला न विचारता हि वेब सिरीज बनवली आहे असे या याचिकेत म्हंटले आहे.

FAQs

तेलगी कोण होता ?

तेलगी एक सामान्य कुटुंबातील मुलगा होता.29 जुलै 1961मध्ये कर्नाटकातील खानपूर या गावी त्याचा जन्म झाला.तेलगीचे आई आणि वडील दोघेही भारतीय रेल्वेत कर्मचारी होते.

तेलगीला कितीवर्षाची शिक्षा झाली?

तेलगीला 2006 मध्ये 30 वर्षाचा सश्रम कारावास आणि 202 कोटीचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तेलगीने कोणत्या बारबालावर किती पैसे उधळले?

तेलगीने तरन्नुम खान नावाच्या बारबालेवर एका रात्रीत 93 लाख रुपये उधळले.

Scam 2003 The Telgi Story सिरीजवर कोणी आक्षेप घेतला आहे?

Scam 2003 The Telgi Story सिरीजवर तेलगीची मुलगी साना आणि जावई यांनी आक्षेप घेतला आहे.

Scam 2003 – The Telgi Story ट्रेलर तुम्ही इथे पाहू शकता.

Leave a comment

भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “… आपल्याला कधी प्रश्न पडलाय का या प्राण्यांचे कान कुठे असतात? भूमिका चावला चा ट्रेंडी लुक व्हायरल… दिशा पटानीचे बॅकलेस सॅटिन ड्रेसमधील मोहक रूप नेटकऱ्यांची तारांबळ ” आठवा अवतार: भगवान कृष्णाच्या जन्माची गाथा “ पंख असूनसुद्धा या पक्ष्यांना उडता येत नाही ! NASA अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर केव्हा परत येतील हर घर तिरंगा या मोहिमेचा हा आहे उद्देश
भगवान विष्णूचे दहा अवतार शेवटचा अवतार हा आहे. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतो नेतृत्वगुण… पूजा हेगडेच्या बोल्डनेसचा मसालेदार तडका सीरत कपूरने केले ग्लॅमरस फोटो शूट नजरच हटत नाही . ” हम बने तुम बने एक दुजे के लिये “… आपल्याला कधी प्रश्न पडलाय का या प्राण्यांचे कान कुठे असतात? भूमिका चावला चा ट्रेंडी लुक व्हायरल… दिशा पटानीचे बॅकलेस सॅटिन ड्रेसमधील मोहक रूप नेटकऱ्यांची तारांबळ ” आठवा अवतार: भगवान कृष्णाच्या जन्माची गाथा “ पंख असूनसुद्धा या पक्ष्यांना उडता येत नाही ! NASA अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर केव्हा परत येतील हर घर तिरंगा या मोहिमेचा हा आहे उद्देश