Vinayak Damodar Savarkar : सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाने २६ किलो वजन कमी केले.

Vinayak Damodar Savarkar

Vinayak Damodar Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर रिलीज

Vinayak Damodar Savarkar यांची २८ मे २०२३ ला १४० वी जयंती झाली या जयंतीचे औचित्य साधून नुकताच रणदीप हुडा अभिनीत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला.आणि महत्वाची बाब म्हणजे रणदीप हुडा स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून त्याचे दिग्दर्शनात पहिले पाऊल आहे.

नुकताच इंस्टाग्रामवर रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा अधिकृत टीझर शेअर केला.

त्यान या टीझर बाबत लिहिले आहे कि “भारताचा सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक. इंग्रजांना सर्वात जास्त भीती वाटणारा माणूस. सिनेमा 2023 मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत Who Killed His Story रणदीप हूडा”

रणदीप तुरुंगाच्या आवारात फिरत असताना टीझर मध्ये दिसतो. “स्वातंत्र्याचा लढा 90 वर्षे चालला होता, पण काही मोजकेच हे युद्ध लढले. बाकीचे सत्तेचे भुकेले होते.” हा संवाद अंगावर काटे आणणारा आहे.
चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले कि , हिंदुत्वाचे विचारवंत Vinayak Damodar Savarkar यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने 26 किलो वजन कमी केले आहे. रणदीपसोबत या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, संदीप सिंग, सॅम खान आणि योगेश राहर यांनी केली आहे.

पंडित यांनी नमूद केले की अभिनेते व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेत असतात.पडद्यावर पात्राचे अचूक चित्रण करण्यासाठी, रणदीपने स्वतःला पूर्णपणे तयार केले आणि कोणतीही कसर सोडली नाही. शूटिंग संपेपर्यंत त्याने अत्यंत कठोर आहाराचे पालन केले, चार महिन्यांच्या कालावधीसाठी दररोज फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध to घेत होता.अस्सल दिसण्यासाठी त्याने मुंडणही केले.
आपल्या चित्रपटाचा टीझर सादर करताना, रणदीप हुड्डा यांनी शेअर केले की चित्रपटावर काम करताना Vinayak Damodar Savarkar यांच्याबद्दल अधिक जाणून घेतल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर खूप वाढला.
उत्कर्ष नैथानी सोबत रणदीप हुडा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सहलेखक म्हणून काम केले आहे.

Swatantrya Veer Savarkar Official Teaser | Randeep Hooda | Anand Pandit | Legend Studios | 2023

The Kerala Story : केरला स्टोरीचे आतापर्यंतचे Box Office collection

Leave a comment

Sonam Kapoor : एक फॅशन आयकॉन स्टार किड ते यशस्वी अभिनेत्री चुराके दिल मेरा गोरिया चली.. National best friend day : जुन्या मित्राशी पुनः संपर्क साधण्याची संधी Neha Kakkar : तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली नेहा 36 वर्षाची झाली. येणारा प्रत्येक दिवस जागतिक पर्यावरण दिन बनवा नाहीतर
Sonam Kapoor : एक फॅशन आयकॉन स्टार किड ते यशस्वी अभिनेत्री चुराके दिल मेरा गोरिया चली.. National best friend day : जुन्या मित्राशी पुनः संपर्क साधण्याची संधी Neha Kakkar : तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली नेहा 36 वर्षाची झाली. येणारा प्रत्येक दिवस जागतिक पर्यावरण दिन बनवा नाहीतर